Breaking News

लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव अजरामर

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कल्याण :- समाजसेवेच्या रणांगणात अखंड झुंजणाऱ्या डॉ. रविंद्र जाधव यांना जागतिक स्तरावर गौरव मिळाल्याने कल्याणसह महाराष्ट्रातील सेवाभावी समाजमनात अभिमानाचे क्षण उभे राहिले आहेत. डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव  ” *लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”*  मध्ये नोंदवले गेले असून, त्यांच्या निस्वार्थ आणि सातत्यपूर्ण समाजकार्यासाठी हा गौरव प्रदान करण्यात आला आहे. लंडनवरून अधिकृत सन्मान प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले असून, या अनोख्या क्षणाची घोषणा ३० मार्च २०२५ रोजी एका संगीतमय कार्यक्रमात करण्यात आली.

हा ऐतिहासिक सन्मान प्रसिद्ध जल रणरागिणी डॉ. मनीषा गांगुर्डे आणि प्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या घोषणेमुळे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली.या गौरवामागे डॉ. मनीषा गांगुर्डे यांचे मोलाचे योगदान असून, त्यांनीच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत *लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड*  संस्थेशी सातत्याने संवाद साधत हा सन्मान मिळवून दिला. या साऱ्या प्रयत्नांबद्दल डॉ. रविंद्र जाधव यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

डॉ. रविंद्र जाधव यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, सेवा आणि मानवतेच्या मूल्यांची जिवंत शिकवण आहे. वृद्ध, गरिब, उपेक्षित यांच्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य समर्पित केले आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळेच समाजात आज ‘माणुसकी’ हा शब्द अधिक जिवंत वाटतो.संविधान सैनिक संघ, माणुसकी धर्म प्रतिष्ठान, डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट या संस्था आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.हा सन्मान केवळ एक पुरस्कार नसून, तो समाजसेवेच्या अंधारात दिवा धरून चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक दीपस्तंभ आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved