jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” चिमूर बसस्थानक येथे गुंगिकारक औषधीद्रव्य पोलीसांनी केला जप्त “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक 15/03/2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे खात्रीशीर खबरीने दिलेल्या माहितीवरून आरोपी नामे मोहम्मद वहीद अब्दुल रहीम वय 45 वर्षे,जात-मुसलमान रा. गोविंदनगर मोमीनपुरा मदरसा जवळ हल्ली मुक्काम पिली नदी जोगी अरविंद नगर नाल्याजवळ नागपुर याचे वर चिमुर बसस्थानक येथे गुंगिकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियमाखाली कारवाई केली असता त्याचे ताब्यातील कथ्या रंगाचे बॅगेत एकुण 1964 ग्रॅम. वजन असलेला गांजा हे गुंगिकारक औषधीद्रव्य पोलीस स्टाफ, पंच, फोटो ग्राफर, मापारी यांचे समक्ष मिळुन आला.

सदर घटनास्थळी गांजा रितसर जप्त करून आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. सदर कारवाई श्रीमती नयोमी साटम, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा अतिरीक्त कार्यभार चिमूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बाकल,स.पो.नि.निशांत फुलेकर,स.पो.नि.मल्हारी ताळीकोटे,पो.उपनि.दत्ताहरी जाधव, सहाय्यक फौजदार विलास निमगडे, सचिन खामणकर, भरत घोळवे, सचिन साठे, कुणाल दांडेकर, सोनु एलकुचेवार यांचे पथकाने केली. सदर आरोपी अटकेत असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर पो.स्टे. चिमूर हे करीत आहेत.
ज्वाला समाचार सच का सामना