jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत चिमूर तालुक्यातील राष्ट्रीय प्रायमरी शाळा चिमूर येथून सुरुवात करण्यात आली.दिनांक 1 मार्चला राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे दूरदर्शी प्रणाली द्वारे राज्यस्तरीय उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबीटकर यांचे हस्ते पुणे येथून संपन्न झाले.तसेच तालुकास्तरावर राष्ट्रीय प्रायमरी शाळा चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अश्विन अगंडे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरी,विस्तार अधिकारी विजय डूमने मुख्याध्यापक विकास पचारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मडावी, डॉ.भुरे,डॉ.मुंगले,तालुका सहायक किशोर गेडेकर,मंगेश हिंगणकर, परिचारिका दीपाली धोटे,प्रयोगशाळा तंत्रदन्य डॉ.बोरेकर,रिंकू जोगी व तेजस्वी पेंदाम उपस्थित होते.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे अंतर्गत शून्य ते 18 वयोगटातील बालकांची सखोल आरोग्य तपासणी करून जन्मजात विकृत. बालपणातील आजार. जीवनसत्त्वाची कमतरता. विकासातील विलंब. किशोरवइन स्वास्थ यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. बाल स्वास्थ कार्यक्रम हा बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचा टप्पा आहे. सर्व संबंधित विभागाणी या उपक्रमात सहभाग घ्यावा तसेच प्रत्येक बालकांची आरोग्य तपासणी करून बालकाना निरोगी बालपण द्यावे असे आव्हान उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ अश्विन अगडे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय प्रायमरी शाळा चिमूर चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना