Breaking News

जि. प. प्राथमिक कन्या शाळा खैरी येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जि. प. . प्राथमिक कन्या शाळेत बाल आनंद मेळावा १ फेब्रुवारी२०२५ ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश इंगोले तर कार्यक्रमाचे उद्घाटक गुलाबराव इंगोले माजी मुख्याध्यापक हे होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शळेचे शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य होते. सर्व प्रथम सावित्रीबाई यांचे प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे रोपटे चिमुकल्यांच्या मनात रुजावे याकरिता मान्यवरांनी सावित्रीबाईंचे शिक्षणा विषयी असलेले विचार व त्यांची थोरवी विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केली.

या कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या शिक्षक वृत्तीचे वर्णन व स्त्री शिक्षणाची महती समाज मनात रुजवताना झालेला त्रास आणी समाजा विरुद्धच्या लढ्यात त्या कश्या यशस्वी झाल्या याचे वर्णन विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सादर केले सोबतचअनेक विद्यार्थ्यीनींनी सावित्रीबाईंची सुंदर अशी वेशभूषा साकारली. यावेळी वर्ग १ते४च्या विद्यार्थिनीनी भाषणे दिली.
आनंद मेळावा साजरा करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वावर उभे व्हावे यासाठी आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी व्यावसायिक स्टॉल उभारून प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ स्टॉलवर ठेवून त्याची विक्री केली व त्याचा आस्वाद शाळेतील चिमुकल्यांनी घेतला.

यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या रांगोळी काढून आपल्या कलेचे प्रदर्शन केले. विविध प्रकारच्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाबद्दल शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक संदीप आडे, हनुमंत इरखडे शिक्षिका सौ नीलिमा दाभाडे तसेच स्वयंसेविका ऋतुजा इंगोले यांनी मार्गदर्शन केले. अशा रीतीने आनंद महोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप आडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनींनी केले त्या आनंदोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका सौ नीलिमा दाभाडे तसेच शिक्षक इरखडे सर व स्वयंसेविका ऋतुजा इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले व आनंद मेळावा यशस्वीरित्या आनंदमय वातावरणात पार पडला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved