जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- केळापूर तालुका येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळा आकोली बु येथील विद्यार्थी यांची शैक्षणिक सहल नागपूर येथे आयोजीत करण्यात आली होती.सकाळी ६ वाजता शाळेतून अतिशय उत्साहात ४४ विद्यार्थी व चार कर्मचारी यांच्यासह बसणे प्रस्थान करण्यात आले.सर्वप्रथम जामठा येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला भेट देऊन तेथील व्यवस्थापक व सुरक्षारक्षक यांच्याकडून संपूर्ण खेळाविषयी माहिती जाणून घेतली ,त्यानंतर नाश्ता करून साउथ एअरपोर्ट ते ऑटोमेटिव्ह स्केअर रिटर्न पर्यंत विद्यार्थ्यांनी लुटला जीवनातील पहिला मेट्रो प्रवासाचा आनंद…प्रवासात मेट्रो अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना तिकीट कसे स्कॅन करायचे प्लॅटफॉर्म कसे बदलायचे मेट्रोचे तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान विषयक रुची निर्माण करण्याकरिता “रमण विज्ञान केंद्र” येथे भेट देऊन तारामंडळ थ्रीडी शो,सायन्स एक्सपो चा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.त्यानंतर महाराज बाग येथे भेट देऊन वन्यप्राणी व वनस्पती याविषयी माहिती देण्यात आली तेथे जेवण आटपून” दीक्षाभूमी “येथे भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून तेथील फोटो प्रदर्शनीला भेट देऊन त्यांचा संपूर्ण संघर्षमय जीवन प्रवास समजावून घेतला.विशेष म्हणजे नाश्ता फराळ जेवण हे शाळेतील कर्मचारी यांनीच विद्यार्थ्यांना तयार करून दिले.
या सहलीकरिता प्रकल्प अधिकारी सुहासजी गाडे साहेब,श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे सचिव व आमचे संचालक सचिन दादा घोगंटे साहेब,सहाय्यक प्रकल्प अधिकारी उके साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यालयातील मुख्य लिपिक पवार साहेब यांनी तत्परतेने स्वतः एसडीओ कार्यालयात जाऊन माननीय प्रकल्प अधिकारी साहेब यांची स्वाक्षरी घेऊन परवानगी मिळून दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार…तसेच श्री गाडगे महाराज आश्रम शाळेतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही अस्मरणीय सहल सफल होऊ शकली.
ज्वाला समाचार सच का सामना