Breaking News

आदर्श युवक विकास मंडळ, राळेगाव द्वारा आयोजित R.P.L-2क्रिक्रेट खासदार चषक २०२५ चा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

राळेगाव :- राळेगाव येथे आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव, व्दारा R.P.L -2 क्रिक्रेट खासदार चषक २०२५ सामण्याचे बक्षीस वितरण सोहळा दिनांक १८-१-२५ रोज शनिवारल संपन्न झाला.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.अंतिम सामन्याचा दोन्ही मंडळाच्या खेळाडुंचा परिचय खासदार संजय देशमुख यांचे चिरंजीव पुर्वीराज संजय देशमुख यांनी करून यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली.प्रथम बक्षीस हे ५०,००० हजार रुपये हे जय हनुमान बाभुळगाव , यांनी पटकाविले , व्दितीय क्रमांक २५,००० हजार रुपये हे राजवाणी फॅशन मोहदा,यांना पटकाविले तृतीय बक्षीस १५,००० हजार रुपये हे पठाण ४ कळंब यांनी पटकाविले, तर चतुर्थ बक्षीस १०,००० हजार रुपये हे गुड मार्निग गृप राळेगाव यांनी पटकाविले, व इतर प्रोत्साहन बक्षीस अनेक क्रिकेट मंडळाने पटकाविले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अँड .प्रफुल मानकर, अँड.प्रफुलसिंह चव्हाण , अरविंद वाढोणकर, जानराव गिरी,नंदकुमार गांधी, विनोद काकडे, प्रवीण कोकाटे, अल्पेश देशमुख प्रदिप ठुने,शशिकांत धुमाळ, कीर्तीश ठुने, हरीष गुल्हाने , जाहीर राजवानी , सुरेश गहरवाल, डॉ.चव्हाण मोहदा, चंदुभाऊ चांदोरे,,राजेंद्र दुधपोळे, अंकित कटारिया विनय मनोत,नरेश जिवने,गुड्डु मेहता ,महेश भोयर , अमीर पठाण, निलेश मिटकर, बाबु धतकार या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित वितरण सोहळा संपन्न झाला.या सामन्याचे आयोजन हे आदर्श युवक विकास मंडळ, राळेगाव चे अरुण सेगेकर, अशोक भागवत उपाध्यक्ष, फिरोज लाखानी सचिव, धनंजय सेगेकर सहसचिव, सैयद युसुफ अली सदस्य, प्रदिप ठुने सदस्य व समस्त आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव यांनी केले होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved