जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- संक्रांतीचा उत्सव हा महिलांसाठी आनंदाची पर्वणी असते. हाच आनंद द्विगुणित करण्याकरिता ब्राम्हण समाजातील महिलांनी एकत्रित येऊन ब्राम्हण महिला समाज कमिटी स्थापन करून सर्व समाजाला सामील करून एकत्रित आगळा वेगळा हळदी कुंकू समारंभ साजरा केला.मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सन आहे.

नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिलाच सन आहे त्यात मकर संक्रांत महटल की डोळ्यासमोर येतो तो हळदी कुंकवाचा समारंभ मकरसंक्रांतीच्या हळदीकुंकवात वान देण्याची पद्धत आहे. हाच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आगळा वेगळा घेण्याच्या उद्देशाने ब्राम्हण समाजातील महिलांनी एकत्रित येऊन ब्राम्हण महिला समाज कमिटी स्थापन केली.

आज सकाळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीचे माध्यमातून मडक्याचा वान खरेदी केला. श्रीहरी बालाजी मंदिरात (घागर) मडक्यांची पूजा करून. सर्व समाजातील महिलांना हळदी कुंकवात मडक्याचा वान वाटप करण्यात आला. चिमूर शहरात प्रथमच ब्राम्हण महिलांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने आगळा वेगळा हळदी कुंकू समारंभ साजरा केला.
ज्वाला समाचार सच का सामना