Breaking News

मृत अवस्थेत आढळला अस्वलीचा मृतदेह

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- दिनांक :- 08/01/2025 रोजी चिमर वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र खडसंगी नियतक्षेत्र खडसंगी येथील मौजा खुर्सापार येथे वन्यप्राणी अस्वल (नर) आकस्मितरित्या मृत पावले.

खडसंगी उपक्षेत्रापासून 10.00 किलोमिटर अंतरावर खुर्सापार ते आमडी रोडवरील पुलाच्या खाली दिनांक 08.01.2025 रोजी वेळ सकाळी 10.30 वाजता वन्यप्राणी अस्वल (नर) 01 मृत अवस्थेत गस्ती दरम्यान आढळून आले. घटनेची माहीती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमुर यांनी आपल्या चमुसह घटनास्थळी जावून पाहणी केली असता वन्यप्राणी अस्वल हा मृतावस्थेत आढळला. त्यांची माहीती उपवनसंरक्षक,ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी व सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी यांना देण्यात आली.

थोड्याच वेळात सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी व तरुण पर्यावरणवादी मंडाळाचे अमोद गौरकर घटनास्थळी हजर झालयावर त्यांचे समक्ष पंचनामा व जप्तीनामा नोंद करुन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलमान्वये वनगुन्हा क्रमांक 09134/228345/2025, दिनांक 08/01/2025 नोंदविण्यात आला.

सदर मृत अस्वलाचे शव वनविश्राम गृह खडसंगी येथे आणण्यात आले. पशुधन विकास अधिकारी चिमुर व शंकरपुर यांचे हस्ते सर्वासमक्ष शवविच्छेदन करुन रासायनिक विश्लेषणाकरीता विसेरा घेण्यात आला व त्याच ठिकाणी सर्वासमक्ष त्याचे शव दहन करण्यात आले. सदर अस्वलाचे वय 4 ते 4.5 वर्षाचे असून त्यांचे सर्व अवयव शाबूत होते. अस्वलाचे उजव्या बाजुने पोटावर जुनी जखम असून तो उपाशी असल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला असावा असे प्रथम दर्शनी दिसून येते. सदर मृत अस्वल प्रकरणाचा तपास सुरु आहे.

सदर घटने दरम्यान ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी चे सहाय्यक वनसंरक्षक डॉ.महेश गायकवाड,अमोद गौरकर तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपुर, चिमुर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर,उत्तम घुगरे,रुपेश चौधरी,रुपेश केदार,संजय पाटील,समित जाधव,योगेश अंतमवाड,रामदास नैताम वनपाल गस्तपथक व त्यांची चमु व इतर वनकर्मचारी कारवाही दरम्यान हजर होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved