Breaking News

फोर व्हीलर स्कार्पिओ वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने एक ठार तर एक गंभीर जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर  :- चिमूर तालुक्यातील जांभुळघाट ते भिसी मार्गावर झाला अपघात. एका फोर व्हीलर स्कार्पिओ चारचाकी वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने एक गंभीर जखमी तर एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार जखमी प्रदीप दिलीप जांभुळे हा त्याची Hero Honda मोटर सायकल MH 34 T- 9276 ने आपला मित्र नामे अभिषेक बारेकर याचे सह आंबेनेरी ते जांभुळघाट मार्गे जात असताना पारडपार बस स्टॉप जवळ जांभूळघाट ते भिसी मार्गाने येणाऱ्या वाहन क्रमांक MH 34 – AR 7258 स्कार्पिओ चालकाचे त्यांच्या ताब्यातील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून जखमीच्या टू व्हीलर गाडीला जोरदार धडक दिली असता अभिषेक बारेकर वय 28 वर्षे राहणार आंबेनेरी तह.चिमूर हा जागीच ठार झाला असून टू व्हीलर चालक प्रदीप दिलीप जांभुळे वय 24 वर्षे राहणार आंबेनेरी तह.चिमूर हा गंभीर जखमी झाला आहे. हि घटना आज दिनांक 29/12/2024 ला दुपारी 1:30 ते 2:10 वाजताच्या सुमारास घडली आहे.

फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून आरोपी स्कार्पिओ वाहन चालक प्रमोद दयाराम दडमल वय 40 वर्षे राहणार गरडापार विरुध्द कलम 281,106 (1),125 (अ) गुन्हा नोंद करून पुढील तपास भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पाटील करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved