जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर येथे दिनांक 01 ऑक्टोबर ते 07 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह दिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र कार्यालय चिमूर येथे आज दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मिळून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, JFM सदस्य, PRT सदस्य,चिमूर टायगर ग्रुप, चिमूर क्रांती बहुउद्देशिय फांडेशन, पत्रकार वन्यजीवप्रेमी व चिमूर येथील स्वयंप्रेरणेने प्रेरित नागरिकांनी रक्तदान केले. सदर शिवीरात एकुण 32 सदस्यांनी स्वंयप्रेरणेने 32 बॅग रक्तदान केलेले आहे.

वन्यजीव सप्ताह 01 ते 07 ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येतो.दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी रक्तदान शिबीराचे वनपरिक्षेत्र कार्यालयच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले. याप्रसंगी परिक्षेत्रातील वनकर्मचारी,JFM सदस्य, PRT सदस्य,टायगर ग्रुप तसेच चिमूर क्रांती बहुउद्देशिय फांडेशन यांनी उस्फुर्तपणे रक्तदान शिबीरास येवून रक्तदान करुन आपल्या सामाजीक दायीत्वाचे पालन केले.

या रक्तदान शिबीराप्रसंगी छोटेखाणी कार्यक्रमाचे प्रमुख किशोर देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमूर,डॉ.अश्विन अगडे वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमछर, पंकज पवार,समाज सेवा रक्तपेढी अधिक्षक चंद्रपुर,विश्वास महाबळे, रक्तपेठी वैज्ञानिक अधिकारी उपजिल्हा रुग्णालय चिमूर व त्यांची चमु,एस.आर.औतकर क्षेत्र सहाय्यक भिसी,यु.बी.घुगरे क्षेत्र सहाय्यक खडसंगी,आर.डी.मेश्राम क्षेत्र सहाय्यक चिमूर,ए.बी.वाळके वनपाल मध्यवर्ती काष्ठ आगार खडसंगी,आर.डी.नैताम वनपाल (गस्तपथक चिमूर),रुपेश केदार वनरक्षक भान्सुली,अक्षय मेश्राम वनरक्षक चिमुर, विलास कपाळे वनरक्षक भिसी,यशवंत पोतराजे वनमजुर तसेच क्षेत्रीय वनकर्मचारी अधिकारी यांनी परिश्रम घेवून रक्तदान शिबीराचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
ज्वाला समाचार सच का सामना