बैलबंडी व ट्रॅक्टर सहित हजारोच्या संख्येत शेतकरी हल्लाबोल मोर्चात सामील
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांचे नेतृत्वात बैलबंडी, ट्रॅक्टर सहित हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय चिमूर वर हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला कामावर असलेल्या मजुरांचे व कुशल कामांचे पैसे तात्काळ देण्यात यावे. वन जमिनींचे पट्टे लाभार्थ्यांना लवकरात-लवकर देण्यात यावे. घरकुल योजनांचे पैसे जराही विलंब न करता लाभार्थ्यांना लवकर देण्यात यावे.

अतिवृष्टीमुळे पडलेले घर व गुरांचे गोठे पीडित कुटुंबांना तात्काळ मदत करण्यात यावी. वाढविण्यात आलेली वीज दरवाढ मागे घेण्यात यावी. ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याकरिता मागेल त्या शेतकऱ्याला सरसकट जाळीचे कुंपण मोफत पुरविण्यात यावे. वन जमिनीवरील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही वन विभागाने त्वरित थांबवावी.या मागण्यांचे अनुषंगाने शेतकरी न्याय यात्राचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रमाला खासदार नामदेवराव किरसान, माजी आमदार अविनाश वारजूकर. चिमूर विधानसभा समन्वयक सतिश वारजूकर, विजय पाटील गावंडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर,गजानन बुटके महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी, अविनाश अगडे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर विवेक कापसे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर, साईश वारजूकर महासचिव प्रदेश युवक काँग्रेस महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती होती शेतकरी न्याय यात्रा व हल्लाबोल मोर्चा स शेतकऱ्यांचे न्याय, हक्कासाठी न्याय मोर्चात सर्व चिमूर तालुक्यातील शेतकरी बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
ज्वाला समाचार सच का सामना