खनिज निधीतून तब्बल 5.98 कोटी निधी मंजूर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांचा विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामाच्या माध्यमातून सपाटा सुरु असतानाच चिमूर क्रांती भुमितील उपजिल्हा रुग्णालय स्मार्ट करण्याकरिता जिल्हा खनिज निधीतून तब्बल 5.98 कोटी रुपये मंजूर करण्यात आमदार भांगडीया यांना मोठे यश मिळाले आहे.

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे अनेक सोयी सुविधाचा अभाव होता तेव्हा काही दिवसा अगोदर आमदार बंटी भांगडिया यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयातील सोई सुविधा विषयी प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. आज अखेर आमदार बंटी भांगडिया यांचे प्रयत्न यशस्वी झाले असून चिमूर क्रांती भूमितील उपजिल्हा रुग्णालय लवकरच स्मार्ट होणार आहे.
ज्वाला समाचार सच का सामना