Breaking News

भिसी शहरातील महिलांनी मुख्यमंत्री लाडली बहीण या योजनेचा लाभ घ्यावा – सौ.मंजुषाताई ठोंबरे

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/भिसी :- राज्याच्या महायुती शासनाने पावसाळी अधिवेशनात महिलांच्या आर्थिक स्वातत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे तसेच कुटुंबात निर्णायक भूमिका करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. भिसी शहरातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावे असे भाजप महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ. मंजुषाताई ठोंबरे यांनी केले आहे.महिलांना कागद पत्र संदर्भात काही अडचणी असतील तर आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात सोडविण्यासाठी प्रयत्नात राहू.भाजप पदाधिकारी महिलांनी इतर महिलांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे.

भाजयुमो माजी तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांच्या निवासस्थानी बैठकीत तालुका महामंत्री सौ.दीपाली बानकर, सौ.मंजुश्री मुंगले,सौं.योगिता गोहने,सौ.काकपुरे ताई, सौ योगिता पाटील सौ साधना मुंगले,श्रीमती इंदिरा नागपुरे, सौ.मंजूषा खवसे,सौ.लता,सौ.दीपाली नेरलावार,सौ.उघडे मॅडम,सौ.घरडे सौ लता उघडे,सौ.तुरारे ताई सौ.मीरा ठोंबरे आदी महिला यावेळी उपस्थित होत्या.

★   *महत्त्वाची घोषणा!*  ★

मुख्यमंत्री- *माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ.* यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासननिर्णयात केलेल्या *महत्त्वपूर्ण बदल* .

● *सदरील योजनेसाठी वाढीव मुदत – 31 ऑगस्ट 2024*

● *कुटुंबाची 5 एकर शेतीची अट वगळली*

● *वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष*

● कुटुंबातील एका *अविवाहित महिलेलाही* याचा लाभ मिळणार

● *2.5 लाखाचा उत्पन्न दाखला नसेल* तर *पिवळे/केशरी शिधापत्रिका* असेल तर त्यांना *उत्पन्न दाखल्याची सुट*

● *अधिवास/रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे*

१. *रेशनकार्ड/शिधापत्रिका*

२. *मतदार ओळखपत्र*

३. *शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र*

४. *जन्म दाखला*

या ४ पैकी कोणतेही *एक कागदपत्र ग्राह्य* धरले जाईल.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved