१२ पैकी १२ उमेदवार विजयी शिवसेना ( उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांचे नेतृत्व
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील गिरसावळी येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक दिनांक २३/०६/२०२४ ला नुकतीच पर पडली. या निवडणुकीत शिवसेना प्रणित परिवर्तन विकास पॅनलचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले असून सर्व १२ उमेदवार विजयी झाले आहे.

या सर्व विजयी उमेदवारांचा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाकार्यालयात जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या हस्ते आज दिनांक २५/०६/२०२४ रोजी सत्कार तसेच अभिनंदन कार्यक्रम करण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख अमितजी निब्रड, विधानसभा समन्वयक सुधाकरजी मिलमिले, उपजिल्हा प्रमुख वसंताजी मानकर,ज्येष्ठ शिवसैनिक तथा शिवदूत बंडूजी डाखरे,आदिवासी नेते रमेश मेश्राम,शाखा प्रमुख मनोज गाडगे व सर्व विजयी उमेदवार उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना