Breaking News

हायकोर्टाच्या टिकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही पत्रकारांवरील हल्ल्यांचा केला जाहीर निषेध

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की अलीकडच्या काळामध्ये वार्ताहर पत्रकार आदेश विकृती पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील पत्रकार सोशल मीडियावरील पत्रकार फ्रीलान्सर मुक्त पत्रकार सातत्यानं समाजातील शासन व्यवस्थेतील राजकारणातील समाजकारणातील समस्या परखडपणे आपापल्या माध्यमातून मांडत असतात गंभीर समस्यांना वाचा फोडत असतात हे सर्व करत असताना त्यांच्याकडून काही प्रस्थापित गुंड प्रवृत्तीचे व समाजकंटकांच्या भावना दुखावल्या जातात सर्वसामान्य जनतेशी निगडित प्रश्न हाताळताना काही लोकांचा इगो हर्ट होतो त्यामुळे ते पत्रकारांशी असभ्य वर्तन करतात यासंदर्भात 2019 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने “पत्रकार संरक्षण कायदा” आणला 1) पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना ५० हजाराचा दंड आणि 2) पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. पत्रकारांना धमकावल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही.

अशी व्यवस्था झाली पाहिजे पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर सुद्धा एफ.आय.आर. नोंदवला जाईल अन्यथा एस.एस.पी.एम. कारवाई केली जाईल. पत्रकार जमावाचा भाग नाहीत हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी राज्य सरकारला ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलिस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत.

पोलिस जशी गर्दी हाटवतात तशी पत्रकारांना वागणूक देऊ शकत नाहीत. पोलिस किंवा अधिक-यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे काटजू म्हणाले. एखादा वकील आपल्या अशीलाला हात्येचा खटला न्यायालयात लढतो, तसा तो खुनी होत नाही. तसेच पत्रकार त्यांचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात प्रत्येक गर्दीचा भाग नसतात. त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या संदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कैबिनेट सचिव गृहसचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सर्व राज्याच्या सचिवांना सूचना काढल्या असून पत्रकारांसोबत पोलिस, भूखंड माफिया, शेअर ट्रेडिंग करणारे ट्रेडर्स धन दांडगे गुंड प्रवृत्तीचे लोक अशा लोकांकडून पत्रकाराला जीवे मारणे, खंडणी मागितली म्हणून खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्यावर अत्याचार करणे असे प्रकार आता यापुढे केले तर संबंधितांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे.

*ताजा कलम*

*प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया फ्रीलान्सर { मुक्त पत्रकार } वृत्तपत्रातील तांत्रिक विभागातील कामगार पेपरची लाईन टाकणारा कामगार हा फक्त भाषणामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे प्रत्यक्षात एक असुरक्षित असंघटित आणि कायम शाशन व्यवस्थेकडून दुर्लक्षित घटक झाला आहे जबाबदार कोण ???*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved