Breaking News

शेअर मार्केटचा आणखी एक बिग बुल वरुर बुद्रुक चा भामटा सोना लहु तावरे कोट्यवधी रुपये घेऊन फरार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक येथील मुळचा रहिवासी असलेला काही महिन्यापूर्वी रसवंतीगृह चालत असलेला त्या पूर्वी मटणाच्या दुकानात कामाला असलेला रातोरात लखपती झाला महिंद्रा ची थारगाडी टी हि पाहुण्याच्या नावावर ब्रेझ्झा गाडी नातेवाईकांच्या नावावर पुण्याला गर्लफ्रेंड सगळी ऐश आणि माज लोकांच्या पैशांच्या जिवावर आपला एक कृषी सेवाकेंद्रावाला मित्र हाताशी धरून लोकांकडून लाखो रुपयांच्या ठेवी घेऊन परागंदा झाला शेवगांव शहरातील कोरडेवस्ती सह वरुर गांव आणि पंचक्रोशीमधील नागरिकांना पाहुण्या रावळ्याना शेअर मार्केटचे साम्राज्य ग्रुप फायनांस च्या नावाने आमिष दाखवून कोट्यावधी रुपये गोळा करून आठ दहा दिवसांपूर्वीच नॉट रिचेबल झाला 20 जून ला तुमचे सगळे पैसे व्याजासह परत देतो असा बनाव करून फरार आहे.

तो पुण्यात लोकांच्या पैशांच्या जिवावर रम रमा आणि रमी च्या नाडी लागला असल्याची चर्चा आहे बीग बुल सोना लहू तावरे वरुर बु. फरार झाला आहे. {{ साम्राज्य ग्रुप इन्व्हेस्टमेंट या नावाने बोगस इन्वेस्टमेंट कंपनी शेवगाव शहरातील आखेगाव रोड येथील एका कृषी सेवा केंद्रामध्ये दिवसभर बसून लोकांचे घर घालण्याचे धंदा करत होता तो साथीदार भामटा कोण ??? त्याने गुंतवणूकदारांना भेटून 20 जुन रोजी पेमेंट करणार होता पण त्यापुर्वी पळून गेला आहे }} “मी शेवगावकर” चा दणक्यामुळे हळूहळू बिळात लपून बसलेले अनेक भामटे बिगबुल्स रात्रीतून गायब होत आहेत एका महाभागाने स्वतःला महाराज म्हणऊन घेणाऱ्या व सध्या फरार असलेल्या भामट्याने एक ऑनलाइन ऑडिओ क्लिप प्रसारित केली आहे त्यात त्याने सरळ सरळ सांगितले आहे मी 10 कोटी गोळा केले त्यातले व्याजापोटी मी गुंतवणूकदारांना पाच कोटी वाटले 3 कोटी रुपये मी “फॊरेक्स” मार्केटमध्ये लॉस गेलो आता माझ्याकडे काही लाख रुपये शिल्लक आहेत मी तुम्हाला एक रुपयाही देऊ शकत नाही हा निर्लज्जपणाचा कळस आहे.

तुला जर शेअर मार्केट मधलं काही कळत नव्हतं तर लोकांच्या आयुष्यभराच्या कष्टाच्या कमाईशी खेळण्याचा अधिकार तुला कोणी दिला ??? असा प्रश्न आता गुंतवणूकदार त्यांना विचारत आहे परंतु हे सर्व भामटे नॉट रीचेबल आहेत चोरासारखे रात्री अपरात्री गावाकडे येतात काहीणी तर लोकांच्या पैशातून खरेदी केलेल्या जमिनीचे व्यवहार ऑनलाईन विकुन मोकळे झाले आहेत रात्रीतून सोयऱ्या धायऱ्याना प्रॉपर्टी विकून तेही लाखो रुपये घेऊन गेले आहेत “गुंतवणूकदारांना वसुलीसाठी त्यांची शेती वाडी घरदार एवढीच एक आशा होती ती सुद्धा त्यांनी रातोरात विकून आपल्या कुटुंब कबिल्यासह फरार झाल्याने” तालुक्यातील हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत त्यांच्यासमोर कायदेशीर कारवाई करणे रीतसर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणे एवढाच पर्याय शिल्लक राहिला आहे.

All the Deposit Takers in our Taluka have committed offence under Section 3, 5, 21 and 23 of ” The Banning of unregulated deposit schemes Act. Police station incharge can register offence, take searches, arrest accused and conduct investigation. However, as per section 31 , he has to take prior permission of Supritend of Polis In the alternative, sections 3& 4 of MPID can also be added alongwith IPC 420 120 (B) कायदेशीर कारवाई करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही सोशल मीडिया वरून चल पुढच्या वढ्यात 30 मे ला नक्की देतो 6 जुन फायनल डेट आता तर काय नाही टाईम टेबल काढले आहे सप्टेंबरमध्ये व्याज जानेवारी 25 मध्ये 25% जून 2025 मध्ये 25% जानेवारी 2026 मध्ये उरलेले 25% आणि फायनल रक्कम डिसेंबर 2026 मध्ये जर माझ्याकडे आले तर नक्की देईन हा “पापाचा माल गपापा” या व्यक्तीप्रमाणे मला समजून घ्या मी अडचणीत आहे अशा खोट्या बनवण्यापूर्वी शेवगाव तालुक्याच्या बाहेर पंचतारांकित जीवन जगत आहेत यांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार अहमदनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक  राकेश ओला साहेब व त्यांचे सहकारी निश्चितच यांनाधडा शिककतील अशी अपेक्षा फसवणूक झालेल्या हजरो गुतंवणूकदारांना आहे.

*ताजा कलम*

यातील अनेक फरार बिग बुल्स ने पुण्यनगरी पुणे शहराचा आश्रय घेतल्याचे दिसत आहे बाणेर हिंजवडी आळंदी खराडीया भागात वास्तव्यास असल्याच्या खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे काही दिल्लीत गेले आहेत अशी चर्चा आहे

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved