पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-दिनांक. १३/०६/२०२४ व १४/०६/२०२४ ला सुरेश नामदेवराव साळवे वय ५९ वर्ष राहणार निफंद्रा, ता. सावली, जि. चंद्रपूर यांना पैशाच्या वादातून मुलांनी व जावई यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करूण हातपाय बांधून मारहान करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आले,असून सुरेश नामदेवराव साळवे हे स्वःताचे राहते घरी सकाळी ८.०० वा हजर होते तेव्हा त्यांचे जावई चंद्रकांत वसंतराव करपे आणि सुरेश नामदेवराव साळवे यांचा मुलगा नामे १) उमाकांत सुरेश साळवे २) लक्ष्मीकांत सुरेश साळवे व त्यांची पत्नी सौ. लता सुरेश साळवे रा.निफंद्रा हे निफंद्रा येथे घरी आले ते सर्वजण गोंदियाला जावयाकडे राहत होते. तसेस सुरेश नामदेवराव साळवे हे एकटेच गावात राहून कसेबसे जीवन जगत होते, अशाही अवस्थेत त्यांची मुले आणि जावई म्हणाले की, साल्या माजरचोदा, मी पोलीस आहे व गोंदिया एलसीबी मध्ये काम करतो माझे कोणीही काहीही बिघडवू शकत नाहीं. तुझ्याकडे असलेली जमीन तु का म्हणुन विकली, ते सर्व पैशे मला दे, असे म्हणून माझे शेतातील सौदयाचे ५०,०००/- रुपये सुरेश नामदेवराव साळवे यांच्या खिशातुन मुलांनी पैसे आणि मोबाईल दोन्ही हिसकावून घेतले आणि शिवीगाळ करू लागले तेव्हा माझेवर तुमचा कोणताही अधिकार नाही हि माझी स्वःताहाची प्रापर्टी आहे.

मी स्वःता शेती खरेदी केली आहे व मीच माझ्या स्वतःच्या उदरनिर्वाह खर्चाकरिता शेत जमीन विकले आणि माझे काहीही ऎकून घेत नव्हते व मलाच म्हणाले साल्या, माजरचोदा तु असा कसा विकते, असा म्हणुन लाथा, बुक्यानी मारहान केली व मला माझ्या मुलांनी व जावयाने मिळुन काठीने पायावर, पोटावार, गुप्तागांवर आळी पाळीने पाणी टाकुन चपला जोडयाने खुप मारहान केली तेव्हा माझी पत्नी सुध्दा म्हणाली की मारून टाक हा खुप माजुन गेला आहे असे म्हणुन बोलत होती, तेव्हा माझा लहान भाऊ सोडवायला मध्यस्थी आला असतांना त्याला सुध्दा माझ्या जावयांनी व मुलांनी दोन तिन काड्या मारून हाकलुन दिले.सुरेश नामदेवराव साळवे हे गावातील पोलीस पाटील यांचे हातुन कसेबसे सुटले आणि पोलीस स्टेशन पाथरी गाठले हे गाव ता.सावली येथे असता रतन पोलीसाचे हाताने मेडीकल करिता अंतरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविले रतन पोलीस हा डॉक्टरांना बोलले कि हे त्यांचे नेहमीचेच आहे. तुम्ही असे मेडिकल द्या. तेव्हा डॉ. म्हणाले की, या शरीरावर मार भरपुर असल्यामुळे गुन्हा दाखल होवू शकतो. असे डॉक्टर बोलले असून सुद्धा तो रतन पोलीस पुन्हा म्हणाला की आम्ही पोलीस पाहुन घेतो. तुम्ही सौम्य मेडिकल दया असे म्हणुन माझे मेडीकल करून घेतले. त्यावेळी त्यांचे नातेवाईकांना कोणालाही आत प्रवेश करू दिला नाही व नंतर पोलीस स्टेशन येथे रिर्पाट घेतली ते पण फिर्यादी सुरेश नामदेवराव साळवे यांच्या सांगीतल्याप्रमाणे न घेता त्यांनी आपल्याच मतानी तक्रार लिहीण्याचे केले. आणि पाथरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रविवार असल्याने सुट्टीवर आहे. तुम्ही सोमवारला या मी तुझा गुन्हा दाखल करतो असे म्हणुन धुळकावले,व फिर्यादिस मनाले कि, तु पोलीसाचे विरोधात तक्रार देते का! तुझा जावई पोलीस आहे.

त्याचे तु काही बिघडवु शकत नाही. असे म्हणुन भांडण दाबण्याचा प्रत्न सुरू आहे.असे म्हणुन माझी सही घेतली. व फिर्यादिची अदखल पात्र एनसी रिपोर्ट दिली या अगोदर सुध्दा जावई चंद्रकांत करपे यांनी फिर्यादी सुरेश नामदेवराव साळवे यांच्या घरी येवून माल व्हाऊ गाडी आणि तीच्या चाब्या हिसकावून गाडी क्र.M.H-34/BG4255 हे गाडी घेवून जबर जस्तीने चाब्या हिसकावून गाळी घेवून गेले, आजपर्यंत फिर्यादीची गाडी परत केली नाही. फिर्यादी त्या गाडीच्या किरायावर आपला उदरनिर्वाह करीत होतो. परंतु आता फिर्यादी जवळ जगण्याचे कोणतेही साधन नाही म्हणुन स्वतःची नावे असलेली जमीन विकली.याचा राग धरून फिर्यादिस लाथा बुक्यांनी व काठीने दोन्ही मुलांनी तसेच जावई यांनी हातपाय बाधुन तोंडात बोळा टाकुण अंगावर मिठाचे पाणी टाकुन जिव्हे मारण्याच प्रत्न केला.अशी तक्रार असतांना सुद्धा दखलपात्र गुन्ह्याची नोंद न करता अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस यांच्या माध्यमातुन योग्य ती चौकशी करून फिर्यादिस न्याय मिळवून देऊन आरोपींना शिक्षा व्हायला हवी अशी फिर्यादीने वेब पोर्टलच्या माध्यमातून मागणी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना