विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगा शहरातील माहेश्वरी युवक मंडळ तर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त स्वर्गीय नंदकिशोर रामविलास सारडा यांच्या स्मरणार्थ बालाजी मंदिर मारवाड गल्ली येथे आज शुक्रवार 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावान नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर घुले पाटील यांचे खांदे समर्थक स्वर्गीय नंदकिशोर सरडा त्यांच्या स्मरणार्थ सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर व माहेश्वरी युवक मंडळ शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे सर्वश्रेष्ठ दान रक्तदान येवती प्रमाणे शहरातील युवकांनी तरुणांनी रक्तदान सहभाग घेऊन गरजूंना जीवदान द्यावे असे आवाहन माहेश्वरी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

*ताजा कलम*
*स्वर्गीय नंदकिशोर सारडा यांनी आपल्या सामाजिक राजकीय आणि वैयक्तिक जीवनामध्ये नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजातील तळागाळातील लोकांची सेवा केलेली होती कोरोना काळामध्ये शेवगाव शहरातील कोरोना योद्धा म्हणून त्यांची ख्याती होती परंतु दुर्दैवाने कोरोना आजाराने त्यांचा अंत झाला त्यांच्या स्मरणार्थ एक सामाजिक उपक्रम माहेश्वरी युवक मंडळ शेवगाव यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*
ज्वाला समाचार सच का सामना