Breaking News

“जुना डाक बंगला” / “गेस्ट हाऊस” ची दुरावस्था जबाबदार कोण ???

शेवगाव शहरातील गजबजलेल्या एरियातील जुना डाक बंगला हि वादग्रस्त वास्तू झाली व शहरातील सगळ्यात मोठी कचराकुंडी झाली वाळलेला लिंबाचा वृक्ष घेऊ शकतो अनेकांचे प्राण नगरपरिषद शेवगाव चा आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील 100 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वास्तु भोवती कचराकुंडी चा गराडा आणि परिसरातील चौकाच्या कडेला असलेला वाळलेला लिंबाचा वृक्ष घेऊ शकतो कोणाचाही जीव सोबतच्या दिलेल्या छायाचित्रांमध्ये शेवगाव शहरामध्ये स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून प्रसिद्ध असलेला डाक बांगला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्ट हाऊस त्याची आज दुरावस्था झाली असून संबंधित जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असून या सर्वांमुळे परिसरातील व्यापारी नागरिक आबालवृद्ध ग्राहक यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे या जागेत साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी वाळलेले लिंब वृक्षाचे झाड याचा त्रास सहन करावा लागत आहे.

परिसरातील व्यापाऱ्यांना डास उंदीर निशाचर प्राणी यांचा वरचे वर त्रास होत असतो परंतु या वास्तूची आणि त्या परिसराची झालेली दुरावस्था याचे कोणालाही काहीही देणे घेणे नाही !!! परिसरातील व्यापारी आणि नागरिक या वास्तूचा वापर कचराकुंडी म्हणून करतात काही नागरिक मुतारी म्हणून त्याचा वापर करतात या वास्तूच्या जागेच्या आसपास खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणारे हॉटेल व्यवसायिक अमृततुल्य चहाची दुकाने असल्याने शेवगाव शहरातील आणि तालुक्यातील बरेचसे नागरिक या भागात खाण्यापिण्यासाठी येत असतात परंतु येथून येणारी दुर्गंधी आणि पावसाळ्यात कधीही अंगावर कोसळेल असे झाड अशा भीतीदायक वातावरणात शेकडो जीव आपला मुठीत धरून येथे व्यवसाय करत आहेत { या दुर्गंधी मुळे गंभीर आजारांना निमंत्रण देत आहेत } नगरपरिषदेचा आरोग्य विभाग अतिक्रमण विभाग यांचे याकडेच पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे*

*ताजा कलम*

*फेब्रुवारी 2020 पासून शेवगाव नगर परिषदेवर प्रभारी राज दिसत आहे येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही बहुतेक केडर चे अधिकारी वर्ग पाथर्डी आणि शेवगाव चा कारभार पाहताना दिसत आहेत { त्यांची रोज आषाढी कार्तिकी वारी सुरू असते } आठ-आठ दिवस साहेब ऑफिसला सुद्धा येत नाहीत त्यामुळे नगरपरिषदेचा कारभार आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय असा झाला आहे प्रशासक म्हणून नियुक्तीस असलेले प्रांत उर्फ उपविभागीय अधिकारी एक साधी मीटिंग घेण्याची सुद्धा तसदी करत नाहीत इकडे “राज्य सरकार नुसतं सरकार आपल्या दारी आणि आपल्या घरातच झाली हागणदारी” अशा योजना राबवत आहेत*

{ क्रमशः }

*शेवगाव शहरातील नवीन बांधकाम परवाने झालेल्या अतिक्रमण रोजची भाजी बाजार आणि कपड्यांची वसुली मालमत्ता कर वसुली विभाग सगळाच कारभार रामभरोसे “ज्याच्या हाती ससा तोच पारधी” अशी दुरावस्था नगरपालिकेची झाली*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved