विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755
शेवगाव:-केंद्रातील भारतीय ई-केवायसी पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ई-केवायसी अनिवार्य केली आहे. त्यानुसार ग्राहकांना जोडणी असलेल्या गॅस एजन्सीत जाऊन बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण न केल्यास ग्राहकाला प्रति सिलिंडरवर मिळणारे अनुदान (सबसिडी ) बंद होणार आहे. सध्या गॅस धारकाला संबंधित एजन्सीकडून तसे संदेश मोबाईलवर येत आहेत. ग्राहकांची गॅस जोडणी ज्या नावाने असेल
लागेल. तेथे जाताना लाभार्थ्यांचा मोबाईल, आधार कार्ड व गॅस नोंदणीकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. सदर कार्यालयात ग्राहकाचा बायोमेट्रिक अंगठा घेऊन ही प्रक्रिया एजन्सीकडून केली जाईल.
दरम्यान, ही के.वाय.सी. प्रक्रिया न केल्यास ग्राहकाचे गॅस सिलिंडर वितरण व अनुदान बंद होऊ शकते.
एखाद्या केवायसी जोडणी धारकाचा मृत्यू झाला असल्यास
प्रक्रिया न केलेल्या ग्राहकासोबत
असे झाल्यास तो संबंधित एजन्सीमध्ये
जाऊन ही प्रक्रिया नंतरही करू शकतो. त्यानंतर गॅस एजन्सीकडून संबंधित ग्राहकाची गॅस जोडणी पुन्हा सुरु होईल, ग्राहकांनी त्यांच्या गॅसजोडणीची सुरक्षा तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. दरम्यान, ई-केवायसीमुळे तुमचा मोबाईल क्रमांक बदलला आहे, तो तात्काळ अपडेट होईल.
संबंधित जोडणी दुसऱ्याच्या नावावर करता येईल. गॅस जोडणीमध्ये इतर काही अडचणी असल्यास त्या दुरुस्त करता येतील.
ग्राहकांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी जोडणीमध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच सिलिंडर रिफिलींग बुकिंग करावी, बुकींग केल्याशिवाय वितरण करणाऱ्या व्यक्तीकडून सिलिंडर घेऊ नये, त्यामुळे लाभार्थ्यांच्या सबसिडीचे नुकसान होऊ शकते.
*ताजा कलम*
*ई-केवायसी केल्याशिवाय केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलेंडरवर मिळणारे दर महिन्याचे अनुदान आपल्या खात्यात जमा होणार नाही त्यामुळे आपापल्या गॅस एजन्सीकडे एच.पी. गॅस, भारत गॅस, अथवा इंडेन गॅस च्या आपल्या नजीकच्या केंद्रावर जाऊन आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक हे सर्व घेऊन जाणे अन्यथा पुढील महिन्यापासून आपल्या खात्यात अनुदान खात्यात जमा होणार नाही*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
ज्वाला समाचार सच का सामना