शेवगाव पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वीर यांच्यावर 10,000 रुपयांचे लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगांव :- दिनांक 01 जून 2024 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीस असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वीर यांच्यावर 10,000 रुपयांचे लाचेची मागणी केल्याचा गुन्हा अहवाल यातील तक्रारदार यांचे विरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या तक्रारी अर्जाच्या चौकशी वरून तक्रारदार यांचे विरुध्द कारवाई न करण्यासाठी यातील आलोसे हे लाच मागणी करत असले बाबत ची तक्रार दि.11/03/2024 रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कडे प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीवरून दि.12/03/2024 रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे वीर यांनी तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी इतर पोलिसाने पाच-दहा हजार रुपये घेतले असते,द्यायचे तुमच्या मनाने, हिशोबा हिशोबाने द्या, असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक 31/05/2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- 48 वर्ष, रा.टाकळीभन, ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर
▶️ *आरोपी*
पोलीस हेड कॉन्स्टेबलआलोसे पांडुरंग बाबुराव वीर, पो.हे.कॉ./925, वर्ग-3 नेमणूक-शेवगाव पोलीस स्टेशन, जि.अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-* 5000 ते 10,000/-₹
▶️ *लाचेची मागणी दिनांक-* 12/03/2024
▶️ हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा अधिकारी*:-
श्री.शरद गोर्डे,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. अहमदनगर
मो नं-: 7719044322
▶️ *सहायक सापळा अधिकारी*
श्रीमती छाया देवरे,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि.अहमदनगर
मो.न.8788215086
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी**
श्री.प्रवीण लोखंडे,
पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि,अहमदनगर मो. न.8007679900,
▶️ *सापळा पथक**
पोलीस अंमलदार
सचिन सुद्रुक,
गजानन गायकवाड,
चालक- पोलीस हवालदार दशरथ लाड,
▶️ **मार्गदर्शक* -*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम,
पोलीस अधीक्षक,
मो.नं.9371957391,ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶️मा.श्री.माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक,
मो.नं. 9404333049 ला.प्र.वि नाशिक पतीक्षेत्र,नाशिक
▶️ मा.श्री.नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, मो. नंबर 9822627288,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ **आरोपीचे सक्षम अधिकारी -* मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर
•••••••••••••••••••••••-
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- 0241- 2423677
*@ टोल फ्रि क्रं.1064 *
*ताजा कलम*
*यापूर्वीही शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस उपविभागीय कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर आणि नाशिक यांच्या संयुक्त कारवाई मध्ये अनेक सरकारी मासे गळाला लागलेले आहेत परंतु जिथे ची खोड मेल्याशिवाय जात नाही येवती प्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी एका कर्मचाऱ्याची विकेट पडली याबद्दल शेवगा शहरासह तालुक्यात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*
ज्वाला समाचार सच का सामना