जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- पतंजलि योग समिती खोकरला च्या वतीने खोकरला पतंजलि योग समितीचा ८ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश डोर्लिकर होते. उद्घाटन पंचायत समिती सदस्या वर्षा वैरागडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, योग शिक्षक मारोती पुडके, सामाजिक कार्यकर्ता विलास केजरकर, दिलीप वालदे, योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, अंजली बोरकर, सुरेश घोडे, छाया मेश्राम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी खोकरला पतंजलि योग समितीच्या स्थापना दिनाचे महत्त्व तसेच गुरू पौर्णिमा, शिक्षक दिन, अभ्यास दौरा, रक्षाबंधन, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, जडीबुटी दिन, भारतीय सैनिकांना रक्षाबंधन, आंतरराष्ट्रीय योग दिवस, कोजागिरी, ग्रिष्मकालीन निःशुल्क बालसंस्कार शिबिर, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, अशाप्रकारे वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात. असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन खोकरला पतंजलि योग समितीची यशस्वीतेवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश बुरबादे व प्रास्ताविक योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश सार्वे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दामोधर बोदेले, गणेश उपासे, गीता आगासे, प्यारेलाल शहारे, राजकुमार वहाणे, नितीन कढव, महादेव खोकले, महादेव वंजारी, शालीनी बैस, मंदा चावरे, जयश्री दुधकवार, रजनी कुकडकर, कल्पना दमाहे, पंचकुला पटले, लक्ष्मीनारायण भिवगडे, वनिता अनकर, मिना रोखडे, रंगारी, शामराव गौरी, रामलाल शेंडे, केशव खोटेले, कृष्णा गुणेवार, महादेव चांदेवार, हेमचंद्र रोटके, श्रीकृष्ण जिभकाटे, बंडू बेहरे, प्रमिला बुरबादे, बाबुलाल दमाहे, श्रध्दा पांडे, तसेच पतंजली योग समिती खोकरलाच्या महीला -पुरूष योग साधकांनी सहकार्य केले.
ज्वाला समाचार सच का सामना