पंचशिल बौध्द विहार परसोडि/नाग. येथे बुद्धरुप प्रतिस्थापना
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथील पंचशिल बौध्द विहारामध्ये वैशाख पौर्णिमा निमित्त बुद्धरूप प्रतिस्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात धम्म रॅली, ध्वजारोहण पूज्य भदंत्त चारूदत्त यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या व्दितीय सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सामाजिक कार्यकर्ता तथा समता सैनिक दल तालुका प्रमुख लाखांदूर रोशन फुले यांनी समाजाने एकत्र येऊन लढावे असे विचार व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की बुध्द धम्मात दानाला खूप महत्त्व आहे.
बुद्धमूर्ती दानकर्ते मनोहरजी बोरकर यांचेकडून आपण दानाची प्रेरणा घ्यावी. त्याच प्रमाणे आपल्या समाजाचा काहीलोक स्वतःच्या फायद्यासाठी वापरत करून घेतात त्यांना धडा शिकविण्यासाठी आता समाजाने एकत्र येऊन लढावे. खूप लाठलो बेकिने आता लाठुया एकीने. बुध्दांच्या विचारातील व बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करायचा असेल तर त्यांचे विचार आत्मसात करून घराघरात पोहोचावे लागेल. असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी बारसागडे सामाजिक कार्यकर्ता, उद्गघाटक संदिपजी मोटघरे बु.स.स.स. लाखांदूर, सहउदघाटक युवराजजी सुखदेवे वं.ब.आ. प्रमुख मार्गदर्शक मनोजजी बनसोड प्रबोधनकार, ज्यातीताई रामटेके, तुळशीदासजी भानारकर सचिव,अनिता बोरकर सरपंच, हरिदासजी खोब्रागडे, बाबुराव शेळके व इतर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपालभाऊ मेंठे यांनी तर संचालन प्रशांतभाऊ वासनिक यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सुरेश गजभिये यांनी केले तर कार्यक्रमाच्या येसस्वीतेसाठी पंचशिल बौध्द विहार व बौध्द उपासक उपशिका, समता सैनिक दल व गावकरी बांधवांनी प्रयत्न केले.
ज्वाला समाचार सच का सामना