जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा):- संस्कार चळवळ भंडारा, विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन, दि भंडारा अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅक भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्कार शिबिरात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिके व प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले.
शिबिर प्रमुख तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा भंडारा चे आजीवन सदस्य विलास केजरकर, समीर नवाज, यशवंत बिरे, राहुल मेश्राम, स्काऊट व गाईड चे रत्नेश कोहरू, अंकुश हलमारे, गणेश सार्वे यांनी खेळ व कुठलाही अपघात झाला तर प्रथमोपचार कसा करावा तसेच एखादी आपत्ती आल्यास जसे पुर, किंवा पाण्यात डुबणाऱ्याला कसे वाचावे. रिफनाॅटचे प्रात्यक्षिके करून मार्गदर्शन केले.
त्यावेळी तीन गटात विभागणी करण्यात आली. त्यामध्ये जिया देशमुख, श्रृती गभणे, प्रांजल आकरे, सांची सुखदेवे, प्राजक्ता ढुके, वैष्णवी बागडे, नैताली पारधी, संवेदना पडोळे, प्राजक्ता ढुके, वेदांती गभणे यांनी गटांचे नेतृत्व केले होते.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी वेदांत गभणे, श्रावणी पडोळे, प्रतिक साखरवाडे, श्रावणी गिऱ्हेपुंजे, पूर्वी हेडाऊ, पूर्वेश गिऱ्हेपुंजे, आराध्या लकडे, सोहम मस्के, मयुरी आकरे, सांची सुखदेवे, मृन्मय साखरवाडे, नक्षत्र चोपकर, क्रिष्णा साखरवाडे, सुग्रा गिऱ्हेपुंजे, त्रिशा साखरवाडे, जिया देशमुख, वेदांती गभणे, संवेदना पडोळे, वंश गभणे इत्यादींनी सहकार्य केले.
ज्वाला समाचार सच का सामना