Breaking News

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते  आमदार मोनिकाताई राजळे तत्कालीन खासदार यांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटात बसस्थानका चे काम सुरू झाले परंतु गेली सहा वर्ष गोगलगायीच्या गतीने काम सुरू असून 2019 मध्ये संपूर्ण वर्षभर जुने बांधकाम पाडले 2020 मध्ये पाया खांदला 2021 मध्ये गट भरला 2022 मध्ये पिलर उभे करून मागच्या खोल्यांचा स्लॅब टाकला 2023 मध्ये वरचे लोखंडी शेड टाकले 2024 मध्ये फरशी बसवली अजून लाईट फिटिंग शेडला पायऱ्या फर्निचर चे काम बसेस थांबण्यासाठी चार फुटांची भर टाकून प्लॅटफॉर्म तयार करणे पार्किंग साठी जागा व बसस्थानकासमोरील अतिक्रमण काढून प्रवेशद्वार तयार करणे इत्यादी महत्त्वाची कामे बाकी आहेत { 2018 सहा वर्षांपूर्वी जन्म झालेले मुल यावर्षी एस.टी.ने शाळेत जायला लागली त्यांच्या जन्मापासून काम सुरू आहे } बांधकामावर नियंत्रण मुंबईच्या एस. टी. च्या सिव्हिल अधिकाऱ्यांचे असल्याने डेपो मॅनेजर विभागीय परिवहन अधिकारी अहमदनगर व राज्य परिवहन अधिकारी मुंबई एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत ठेकेदार म्हणतात मला पेमेंट द्या मग मी काम पूर्ण करतो “कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असा कारभार सुरू आहे.

*ताजा कलम*

*शेवगाव शहरातील बस स्थानक हे मराठवाड्याच प्रवेशद्वार असुन सध्या शेवगाव आगाराकडे फक्त 35 ते 40 बस आहे त्यातही निम्म्या नादुरुस्त आहेत डेपो चा कारभार सगळा “राम भरोसे” चालू असुन पाथर्डी, पैठण, गेवराई, नेवासा, बीड, जालना, माजलगाव, परभणीया डेपोच्या मेहरबानी वर बस फेऱ्या सुरू आहेत लांब पल्ल्याच्या अनेक फेऱ्या पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर, पंढरपूर, मुंबई, कल्याण आदी बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत “शेवगाव तालुक्याची प्रवासी संघटना शोधून दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस मिळवा” आशिष स्पर्धा ठेवण्यास काही हरकत नाही*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved