शेवगाव चे माजी नगरसेवक गोरक्षक श्री साईनाथ आधार यांच्या विरोधात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल संशयित आरोपी फरार
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमूख शेवगांव 9960051755
शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 15 एप्रिल 2024 वार सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता सम्राट अशोक नगरच्या कमानी जवळ पैठण रोड येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथून टेम्पो भरून जनावरे खुल्या बाजारात विक्रीसाठी चालले असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे ड्युटीवर असलेले { साध्या गणवेशात असलेले }कॉन्स्टेबल कृष्णा मोरे यांनी सदर टेम्पो अडवला असता गोरक्षक साईनाथ आधाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी { नियुक्तीस असलेल्या पोलिसांना बनावट गोरक्षक समजून } जाब विचारण्यास सुरुवात केली त्यावेळी पोलीस आणि गोरक्षक यांच्यामध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसण हाणामारीत झाले.
यावेळी नियुक्ती असलेल्या कॉन्स्टेबल मोरे यांना साईनाथ आधार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली यावेळी सदर टेम्पो हा पोलीस स्टेशनला घ्या व तुम्ही सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले परंतु गैरसमज वाढत गेल्याने धुडगूस चालूच राहिला अधिकचे पोलीस बळ आणि स्वतः पी.आ. दिगंबर भदाणे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन सदर टेम्पो ताब्यात घेतला व गोंधळाची परिस्थिती निर्माण करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणे भा.द.वि. कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करून कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले या प्रकरणाचा अधिक तपास शेवगावचे पी. आय. दिगंबर भदाणे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.
*ताजा कलम*
संबंधित जनावरे विक्रीसाठी बाजारात चालले असल्याची ऑनलाईन तक्रार 112 या क्रमांकावर पोलिसांना गोरक्षकाने दिली होती त्याची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई करण्यासाठी गेले असता नियुक्तीस असलेले पोलिस आणि गोरक्षक यांच्यामध्ये गैरसमज होऊन वरील प्रकार घडल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास येत आहे
*विशेष बाब*
*स्थानिक पोलीस आणि गोरक्षक यांच्यामध्ये कायमच कुरबुरी आणि वाद होत असतात त्याचीही किनार या घडलेल्या प्रकाराला जबाबदार आहे अशी चर्चा शेवगाव सियारा सह तालुक्यात चालू आहे*
*अविनाश देशमूख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*
ज्वाला समाचार सच का सामना