Breaking News

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती पिलांद्री येथे मोठ्या उत्साहात साजरी

वयोवृद्ध व्यक्तीचा यावेळी सत्कार करण्यात आला

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील पिलांद्री येथे छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याच कार्यक्रमाचे औचित्य साधून वयोवृद्ध व्यक्तीचा सत्कार सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला.वयोवृद्ध व्यक्ती स्त्री – मंजुळाबाई चव्हाण व पुरुष – मनोहरजी भोयर यांना यावर्षी गावातील सर्वात ज्येष्ठ असलेले वयोवृद्ध व्यक्ती म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सहभागीना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सौ.वनिताताई नवघडे(माजी पंचायत समिती सदस्या),कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.प्रतिभाताई चव्हाण(सरपंच),प्रमुख पाहुणे म्हणून रत्नाकरजी बोकडे (उपसरपंच) सचिन नवघडे (बार्टी समतादूत), पंकज बोरकर (तंटामुक्ती अध्यक्ष),दाजिबाजी चव्हाण (पोलीस पाटील), सौ.अर्चनाताई आरिकर(ग्रा.प.सदस्या),सौ.अर्चनाताई दहिलकर( ग्रा.प.सदस्या), भीमराव जांभूळकर(ग्रा.प.सदस्य),सुधाकरजी बारेकर (शालेय समिती अध्यक्ष), राजुजी रोहनकर, विनायक नवघडे, राजगुरू चव्हाण, हेमराज बोरकर, जोतीराव मडावी, राजेंद्र आरीकर, राजेशजी खारकर, हरीचंद आजबले (ग्रा.प.शिपाई),दामोधरजी राणे,विनोदजी बारेकर, संघमित्रा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभम बोरकर, अतुलभाऊ बोरकर, रोहित बोरकर, रामलाल नवघडे, महेश बोरकर, लंकेस्वर लाटकर, बंटी गोंडाने, आशिष चव्हाण, अंकित आरीकर, तसेच गावातील तरुण युवक तसेच युवती यांनी मोलाचे सहकार्य केले. आभार पंकज बोरकर यांनी मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved