जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी लहान मूलांना होणाऱ्या कर्करोगाबद्दल जनजागृती माहीतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा कार्यक्रम डॉ. प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ. दारुडे वैद्यकीय अधिकारी एन.सी.डी.विभाग ,सौ. वंदना विनोद बरडे अधीसेवीका,सौ गीतांजली ढोक आहारतज्ञ , नेहा ईंदूरकर एनसिडी कौन्सिलर ,हजर होते.डाॅ.प्रतिक दांरुडे यांनी काॅन्सरची माहिती दिली.

वंदना बरडे अधीसेवीका यांनी काॅन्सर संबंधित जीवनशैलीची माहिती दिली.गिंताजली ढोक यांनी आहारा संबंधित मार्गदर्शन केले.नेहा ईंदूरकर यांनी कौसिंलींग केलें. प्रास्ताविक तनिष्का खडसाने लाॅब टेक्निशियन यांनी केले व सूत्रसंचालन किरण धांडे आणि आभारप्रदर्शन स्नेहा रामटेके यांनी केले.या कार्यक्रमाला ३० बालकं,आई वडील व नातेवाईक १०० उपस्थित होते. तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आदर्श जीवनशैलीची आधार घेतला तर बर्याच धूरंधर आजारांवर मात करू शकतो.पोषणयुक्त आहार घेण्यासाठी त्याचा शेल्फी पाँइंट तयार करण्यात आला.जेणेकरुन पोषनयुक्त घेतला जाईल.त्याचा प्रचार व प्रसार व्हावा हा उद्देश.
ज्वाला समाचार सच का सामना