Breaking News

गजबजलेल्या वस्तीत खाजगी बेलस्टार मायक्रोफायनान्स कंपनीत धाडसी चोरी

चोरट्याने नेली तिजोरी उचलून किमती ऐवज, लंपास चोरटे सी.सी.टी.व्ही.मध्ये कैद

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव

शेवगाव:-दि.१२ रविवारी मध्यरात्री शेवगावातील आखेगाव रस्त्यावरील परिसरातील एका फायनान्स कपनीच्या कार्यालयातील लोखंडी कंपाटातील आतील एक लाख १० हजार २९३ रुपये रकमेसह लॉकरच घेऊन अज्ञान चोरटयानी पोबारा केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे,या संदर्भात संबधित बेलस्टार मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक रमाकांत शिवराज दाबरगिडे यांनी शेवगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे .

तालुक्यातील बोधेगाव परिसरात मागील आठवड्यात भर दिवसा सलग दोन घरफोडीच्या घटना घडलेल्या असून आता चोरट्यांनी शेवगाव शहराकडे लक्ष वेधल्याने पोलिस यंत्रणे समोर चोऱ्यांचा तपासाचे आव्हान उभे राहिले आहे .या संदर्भात सदर फायनान्स कपनीच्या कार्याल यातील सिसी ट. व्ही. मध्ये तसेच चोरी करून बाहेर जातांना काही व्यावसायिकाच्या सिसी टि. व्ही. कॅमेरॅ मध्ये चोरटे कैद झाले आहेत .याच संस्थेत सुमारे चार वर्षापूर्वी सुद्धा चोरीचा अयशश्वी प्रयत्न झाला होता.

*ताजा कलम*

अलीकडे शेवगाव शहरामध्ये चोऱ्या मोरया आणि चेंज मॅचिंग दुचाकीतून बॅगा मारणे आदी घटनांमध्ये वाढ झालेली आहे यामुळे शेवगाव पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे.

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved