Breaking News

शेवगाव नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून सहा महिन्यापूर्वी लावलेले हायमॅक्स विजेचे खांब नगरपरिषद मस्त नागरिक त्रस्त बल्ब अभावी धुळखात पडून

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:- शेवगाव नगर परिषदेने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये शहरात दंगल झाल्यानंतर शहरातील प्रमुख चौकांमध्ये तातडीने हाय मॅक्स दिवे बसवण्याचा निर्णय घेतला कंत्राटदार कंपनीला तातडीने परवाना देऊन लाखो रुपये खर्च करून विजेचे भव्य असे खांबही बसविले परंतु देखभाल दुरुस्तीसाठी व बल्ब सप्लाय करिता नेमलेल्या { E.E.S.L.} ई.एस.एल. कंपनीचे सुमारे एक कोटी रुपये बिल थकल्याने नगरपरिषद शेवगाव कडे संबंधित हाय मॅक्सच्या खांबासाठी 220 व्हॉट चे सुमारे दहा लाख रुपये किमतीचे बल्ब खरेदीसाठी पैसे नसल्याने संबंधित खांब येणाऱ्या जाणाऱ्यांचा कुतूहलाचा विषय झाला आहे.

गेल्या कित्येक महिन्यापासून शहरामध्ये अनेक भागांमध्ये प्रमुख राज्य महामार्गांवर व चौका चौकामध्ये स्ट्रीट लाईटचे बल्ब हाय मॅक्स चे काम बल्फा विना पडून आहेत शेवगाव नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी साहेब रजेवर असल्याने प्रशासक प्रांत साहेब श्री प्रसाद मते यांचे दुर्लक्ष असल्याने अनेक गंभीर प्रश्न नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत.

*ताजा कलम*

गेल्या सुमारे चार वर्षापासून फेब्रुवारी 2020 पासून नगर परिषदेमध्ये प्रशासक नियुक्ती असल्याने जनतेचे अनेक प्रश्न विकास कामे व शहराच्या साफसफाई च्या समस्या तशाच धुळ खात पडलेले असून अधिकारी व कर्मचारी माजी नगरसेवकांचा ऐकतही नाहीत आणि नवीन होतकरू उमेदवारांचा तर फोन ही घेत नाहीत सगळा कारभारा “आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय”

*विशेष बाब*

कोट्यावधी रुपये खर्च करून शहराचा विकास झाल्याचे कुठेही दिसत नाही 90 कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली आणि शहरात लाखो रुपयांची रस्त्याचे कामे आमदार निधीतून सुरू आहेत सहा महिने ते एक वर्षात ती पुन्हा उघडली जाणार आहेत “परंतु सांगणार कोणाला आणि ऐकणार कोण” ??? अशी परिस्थिती नागरिकांची झाली आहे.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता /पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved