Breaking News

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत विमुक्त भटक्या जमाती यांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हातील धनगर समाजाचे वरोरा तालुक्यातील एक गाव व भद्रावती तालुक्यातील फक्त एक गाव अशी नावे यादित आली आहे.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील धनगर समाजाचे भरपुर प्रमाणात नावे आले त्यांच्यावर कोणताही आक्षेप नाही.

परंतु यावेळी धनगर समाजाचे यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेत वरोरा व भद्रावती तालुक्यातील यादित नावे न आल्याने यादीत नावे येण्यासाठी पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख तथा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन दिले.तसेच यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील धनगर समाजाला मिळावा यासाठी धनगर समाजाचे नेते तथा आमदार गोपीचंद पडाळकर यांच्या प्रतिनिधीशी कॉल द्वारे संपर्क साधुन निवेदन आमदार गोपीचंद पडाळकर यांना मेल केला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved