Breaking News

बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ यांच्या वतीने बाभुळगाव तालुक्याचे ठिकाणी एक दिवसीय भव्य पत्रकार संमेलन शुक्रवार दिनांक 13 आक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक 11 .00 ते 4.00 वाजेपर्यंत महल्ले सभागृह बाभुळगाव ता.बाभूळगाव जि.यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष विश्वगामि पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.संतोषजी निकम सर तर उदघाटक संतोष ढवळे जिल्हा प्रमुख शिवसेना ठाकरे गट संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय डांगे साहेब. प्रमुख वक्ते अरुण राऊत ऑल इंडिया संपादक संघ जिल्हाध्यक्ष यवतमाळ संपादक निर्मल विदर्भ, वाशिम संदेश.साप्ता लक्षभेद महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती पत्रकर राजकुमार भितकर जिल्हा प्रतिनिधी दैनिक सकाळ.संजय राठोड जिल्हा प्रतिनिधी लोकशाही टीव्ही चॅनल यवतमाळ. सन्माननीय अतिथी रमेशजी देसाई राष्ट्रीय महासचिव राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील प्रशांत रामटेके संस्थापक अध्यक्ष गवंडी बांधकाम कामगार मजदूर युनियन महाराष्ट्र प्रदेश महेश दुबे संस्थापक अध्यक्ष जनवादी बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश.प्रफुल्ल मेश्राम महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख राष्ट्रीय विश्वकमी पत्रकार संघ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मीराताई पागोरे तहसीलदार बाभुळगाव सुनील हुड पोलीस निरीक्षक बाभुळगाव रविकांत पवार गटविकास अधिकारी बाभुळगाव पल्लवी. सोटे मुख्याधिकारी नगरपंचायत बाभुळगाव.जानरावजी नागमोते सचिव जनवादी बांधकाम कामगार संघटना वर्धा आदी मान्यवर या आयोजित जिल्हास्तरीय संमेलनामध्ये मार्गदर्शन करणार आहे यामध्ये शोषित पिढीत वंचित कष्टकरी रंजल्या गांजल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पत्रकारांचा संचालित बहुउद्देशिय संघ.भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संपूर्ण देशात सतत लढा देत आहे.

या देशात. दिवसाने दिवस पत्रकारांवरती हल्ले अत्याचार वाढत चालल्यामुळे.सविधानाचा चौथा स्तंभ मानला जाणाऱ्या पत्रकार बांधावा वर अन्याय होऊ नये.आमच्या पत्रकारांच्या.शेतकरी.शेतमजूर.
बांधकाम कामगार व इतर कामगार. सुक्षिशित बेरोजगार. विद्यार्थ्यांच्या. महागाई अश्या अनेक लोकांच्या जिल्ह्यातील समस्या व प्रश्ण आहे. त्या समस्या व प्रश्ण शासनाने लवकरात लवकर सोडव्यात या उद्दत हेतूने बाभुळगाव येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ व जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांच्या सहभागाने पत्रकारांचा शेतकरी.शेतमजूर.गवंडी बांधकाम कामगार व इतर कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी केले आहे .तरी या पत्रकार संमेलनामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व संचालित बहुउद्देशीय संघाच्या सर्व विंगंच्या पदाधिकारी व पत्रकार. शेतकरी.शेतमजूर.कामगार.बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे के. के.चव्हाण जिल्हा संपर्क प्रमुख यवतमाळ यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved