करप्या रोगामुळे झालेल्या नुसकाचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई द्या
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-शेतकरी राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय.चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी चिमूर तहसील मॅडम यांना निवेदन देऊन पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. अन्यथा चिमूर वरोरा राष्ट्रीय मार्ग खानगाव चौरस्तावर चक्काजाम आंदोलन इशारा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी स्मरण पत्रातून केला आहे
त्यावेळी स्मरण पत्र सादर करतानी उपस्थित प्रहार सेवक विनोद उमरे, विलास उमरे, संदीप निखाडे, सुधाकर पाल उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना