जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो राळेगाव तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेचे मुली व मुल हे तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे राळेगाव येथे शिक्षण घेण्यासाठी जातात आणि शासन सुद्धा मुलींना मोफत पहिली ते दहावी पर्यंत बस सेवा देत असते, मात्र राळेगाव तालुक्यातील कोपरी, अंतरगाव, चिखली, वनोजा, धानोरा, येवती, चांहाद, परसोडा, या मार्गावर वेळेवर बस नसल्याने मुलांना व मुलींना त्रास सहन करावा लागत आहे.
राळेगाव पासून वडकी पर्यंत बस असल्याने वडकी वरून वापस येतानी बस पुर्णपणे भरून येत असते, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा शिल्लक राहत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाने शक्य होत नाही.विद्यार्थ्यांनी वारंवार बस डेपो राळेगाव येथे निवेदन दिले मात्र बस चालू झाली नाही विद्यार्थी यांचे मणने असे आहे कि राळेगाव ते धानोरा पर्यंत सकाळी नव वाजता बस चालू करण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व विद्यार्थी उपोषणाला बसु असे सांगितले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना