आरोग्य तपासणी,रक्तदान शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगांव:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगांव व लॉयन्स क्लब ऑफ नागपूर ग्रिनसिटी यांचे संयुक्त विद्यमाने राळेगांव येथे आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर मोफत चष्मे वाटप
शिबिराचे आयोजन दि.१० सप्टेबंर ला सकाळी ११ ते ४ न्यू इंग्लीश हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय राळेगांव येथे करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घघाटनीय कार्यकमाचे अध्यक्ष नगर पंचायतीचे अध्यक्ष रविंद शेराम तर उद्घाटक श्रीमंत राजे मुधोजी भोसले या शिबीरामध्ये नागपूर राहणार असून प्रमुख उपस्थीती तहसीलदार अमित भोईटे , पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव न्यु इंग्लिश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब धर्मे सचिव डॉ.अर्चना धर्मे सुनिल व्होरा अजय सिंग राम खुशलाणी , डॉ. जित सलुजा नगर पंचायत उपाध्यक्ष जानराव गिरी , अँड अल्पेश देशमुख , डाँ. कुणाल भोयर, प्रदिप ठुणे , बाळू धुमाळ , गोवर्धन वाघमारे, राकेश राउळकर डॉ संतोष कोकूलवार . विनय मुणोत उपस्थीत राहणार आहे .
शिबीराला नागपूर येथील सुप्रसिध्द डॉक्टरांची चमु येत असून यामध्ये आचार्य विनोबा भावे मेडीकल कॉलेज अॅन्ड रिसर्च सेंटरचे तज्ज्ञ डॉ. अभुदय मेघे यांच्या मार्गदर्शनात,गुरुदेव लायन्स डायबिटीस ( मधुमेह तज्ज्ञ ) यांचे युनिट गुरुकुंझ, एकनील लायन्स ब्लड बँक यवतमाळ, लायन्स क्लब नागपूर मेडिको तज्ज्ञ डॉक्टर टिम (स्त्री रोग तज्ज्ञ, बाल रोग तज्ज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, दमा अस्थमा, कॅन्सर,
मधुमेह, अस्थीरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, वातरोग, हार्ट स्पेशालिस्ट,
किडनी रोग तज्ज्ञ इत्यादी डॉक्टरांची टिम तपासणी करतील)
या आरोग्य तपासणी शिबिराचा परिसरातील नागरीकांनी लाभ
घ्यावा असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव
समिती राळेगांव यांनी केले आहे .
ज्वाला समाचार सच का सामना