Breaking News

पक्षाच्या नावावर सामान्य माणसाची लुटमार करणाऱ्याची चौकशी करा – पत्रकार परिषदेत प्रशांत कोल्हे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यात काही महिन्या आधी पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडली, त्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांकडून आर्थिक देवाण घेवाण करून उमेदवार निवडल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याबाबत शिवसेने कडून सुद्धा पोलीस पाटील भरती प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. तसेच माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागविली आहे. सदर माहिती प्राप्त होईस्तव शिवसेने कडून करण्यात येणारे आंदोलन स्थगित केले होते.

अशातच भाजपाचे तालुका महामंत्री रोषण बन्सोड यांनी इंडिया आघाडीतील आम्हाचा मित्र पक्ष काँग्रेस यांचे कडून रक्षाबंधनाच्या निमित्य चिमूर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या विषयावर पोष्ट केली. त्या पोष्टवर प्रशांत कोल्हे व भाजप चे रोषण बन्सोड यांच्यात वैचारिक मांडणी, पोष्ट सुरु होत्या, अशातच पोलीस पाटील भरती प्रक्रियाचा विषय निघाला आणि त्यांनी स्वताच आपल्या पोष्ट च्या माध्यमातून पोलीस पाटील भरती प्रक्रियेत पैशे घेतले आणि काम नाही झाले म्हणून परत पण केले. अशी कबुली त्यांनी ग्रुपवर दिली. त्यातच रोषण बन्सोड हे भाजपाचे पदाधिकारी असून, त्यांच्या फोरव्हीलर गाडीवर भाजपचे कमळाचे चिन्ह काढून अनेकांना गंडा घातल्याचे माहिती आहे. रोषण बन्सोड यांचे किराणा दुकान असून अवैध पणे कोरोना काळात मजा या नावाने असलेला तंबाखू मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा किमतीत त्याने विक्री केली. आत्ताच्याही क्षणी हा अवैध व्यवसाय पक्षाच्या नावाने तो करीत आहे.

त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याची व पक्षाचेच कार्यकर्ते यांची निवड करण्यात आल्याचा आमचा असलेला आरोप यात त्यांच्या स्वकबुलीवरून सत्य वाटते. त्याकरिता शासन प्रशासनाने पक्षाचे नाव घेऊन गोर गरीब जनतेला लुटण्याचे काम करीत असलेला रोषण बन्सोड यांची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच भाजपच्या पदाधिकार्यांनी सुद्धा रोषण बन्सोड विषयी जनतेसमोर खुलासा सादर करावा. त्यातच रोषण बन्सोड यांनी माझ्यावर सुद्धा sms/srk कंपनी कडून देणेघेणे झाल्याचा आरोप केला, सदर आरोप हा बिनबुडाचा असून कसल्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण झाली नाही. सुरवाती पासून ते शेवट पर्यंत मी स्वताहा या रस्त्यावर लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत होतो, लढत आहे, आणि लढत राहणार. यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेना उपजिल्हाप्रमूख प्रशांत कोल्हे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, शहर प्रमुख नितीन लोणारे, उपतालुका प्रमुख संजय वाकडे, प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर- , पुंडलीक सायशे, सुरेश डांगे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved