सुरज गुळघाने
वर्धा-सावली:-पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ तरोडा अंतर्गत सावली या गावांमध्ये लंमपी स्किन डिसीज(चर्मरोग) या रोगाचे लसीकरण करण्यात आले तरोडा मदनी, साखरा, सावली या गावांमध्ये लम्पी स्किन डीसिज रोगाचे लसीकरण डॉ. प्रदीप थुल (सहाय्यक पशुधन विकास अधिकारी )पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ तरोडा यांनी पूर्ण केलेले आहे. शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन ,शेतातील गोठ्यावर, बांधावर जाऊन लसीकरण कार्य विनामूल्य पूर्ण केलेले आहे.आता पर्यंत 1700 जनावरांना लसीकरण कार्य पूर्ण केले आहे.
सन 2020 मध्ये या रोगाचे बरेच रुग्ण होते त्यावेळी दवाखान्यामध्ये औषधी साठा अल्प प्रमाणात होता परंतु आता येथे औषधी साठा भरपूर प्रमाणात आहे. जर एखाद्या पशुपालकाकडे या रोगाची लागण झालेली आहे .असे लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ दवाखान्याची संपर्क करावा व जनावरांवर उपचार करून घ्यावा. उपचार विनामूल्य करण्यात येईल. पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. गोठ्यामध्ये नियमित फवारणी करावी माशा व गोचीड, डास यापासून जनावरांचे संरक्षण करावे. नियमित गोठा स्वच्छ ठेवावा. फवारणीसाठी दवाखान्यामध्ये औषधी उपलब्ध आहे ती दवाखान्यामधून घेऊन जावे. असे आवाहन डॉ. प्रदीप थूल यांनी केले आहे. या लसीकरण कार्याला सुरज गुळघाने, पवन गुळघाणे,युवराज धानोरकर,प्रवीण चंभारे यांनी मदत केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना