Breaking News

शेतकरी आत्महत्येची 17 प्रकरणे मदतीकरीता निकाली

अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 1 : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येची एकूण 31 प्रकरणे समितीपुढे ठेवण्यात आली. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 17 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 11 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, तर उर्वरित 3 प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, नायब तहसिलदार गिता उत्तरवार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, पोलिस उपनिरीक्षक दौलत इष्टाम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत, जिल्हा उपनिबधंक कार्यालयाचे अधिक्षक धनराज नंदनवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी शंकर लोडे, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved