Breaking News

सेतू सुविधा चालकांचा मनमानी कारभार थांबवावा

“शासकीय दरापेक्षा जास्त आकारली जातात दर”

“नेरी शहर व्यापारी असोसिएशन,नेरी तर्फे चिमूर तहसीलदार यांना दिले निवेदन”

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक.२५/८/२०२३ ला नेरी शहर व्यापारी असोसिएशन,नेरी मार्फत तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना नेरीमध्ये जी काही आपले सरकार, महा ई सेवा केंद्र तसेच आधार कार्ड च्या ज्या सेवा चालू आहेत व या सर्व सेवा चालवत असतांना सेतू सुविधा चालक यांचा जो मनमानी कारभार तसेच अवाजवी दर आकारून शासनाच्या शुल्काची पायमल्ली करून सर्व सामान्य नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची नेरी शहरा मध्ये लूट चालवलेली आहे ती थांबवावी आणि लूट करीत आहे.

असे आढळून येताच क्षणी सेतू केंद्राची परवाने रद्द करण्यात यावी अशी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी व्यापारी असोसिएशन नेरी यांनी केली. यावेळी नेरी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष मंगेश चांदेकर, सचिव राजु पिसे, गुलाब कामडी, विलास चांदेकर, सहसचिव रवि चुटे , कोशाध्यक्ष विलास पिसे उपस्थित होते. या सेतू सुविधा चालकांवर योग्य कार्यवाही करून यांचे परवाने रद्द करण्यात येईल असे आश्वासन चिमूर तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी दिले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved