Breaking News

दहेगाव येथे मणिपूर घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे (यवतमाळ)

यवतमाळ:-मणिपूर व इतर राज्यात आदिवासी समुदयावर घडत असलेल्या नरसंहार, अत्याचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.राळेगाव तालुक्यातर्गत येत असलेल्या मौजा दहेगाव येथे ट्रायबल फोरम शाखा दहेगावच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पन करण्यात आले.मणिपूर मध्ये जमावाने चार मे रोजी दोन आदिवासी महिलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असुन देशातील महिलांना विवस्त्र करून धिंड काढणे आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करणे, हि घटना मानव जातीचे मन हेलावून टाकणारी आहे.

सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. नंतर जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. ह्यावेळी शंकर पंधरे तालुकाध्यक्ष ट्रायबल फोरम राळेगाव, शाखा अध्यक्ष अजय जुमनाके, सुरज सलाम, रामदासजी परचाके, दिनेश पेंदोंर ,राहुल आत्राम , आकाश परचाके, राजु जुमनाके, दिलीप परचाके, गणेश जुमनाके, समीर परचाके, पुंडलिक मेश्राम, पुनेशवर मेश्राम, संतोष जुमनाके, रामभाऊ ऊईके, प्रदीप गायकवाड,सुरज मडावी, प्रशांत पेंदोंर, मधुकर परचाके, विलास गेडाम, सुनील केळकर,राजु पेंदोर, रवि सलाम,पवन तोडसाम, कुणाल डोणेकार,नरेश मेश्राम,वामन मेश्राम,वंसता मेश्राम, गणेश मेश्राम सागर पेंदोर,सुरज येरमे, गजानन तोडसाम, विना आत्राम, नलुबाई मेश्राम, पुजा पेंदोर, वर्षा पेंदोर आदी महिला, पुरुष समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved