जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालय येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक दिवसीय आयुर्वेदिक कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी बांधवांच्या जीवन पद्धती, चालीरीत्या, रूढी परंपरा, वादन, गीते, लोककथा तसेच आदिवासी कुटुंबाचे नैसर्गिक पारंपरिक अधिवास या बद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणुन डॉ. साळवी सर , निर्मय आयर्वेदा, नागपूर यांनी उपस्थिती दर्शविली, त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आवूर्वेदिक वनस्पती व त्यांचे वेगवेगळ्या रोगांवर कश्याप्रकारे परीणाम करतात या बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सातव सर, डॉ. खटी मॅडम, प्रा. मेश्राम सर व प्रा. पिसे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. बिजनकुमार शिल यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ. युवराज बोधे यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना