जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे महाधिवेशन महती आडोटीरीअम बालाजी कॉलोनी बालाजी कॉलोनी तिरुपती ( आंधप्रदेश ) येथे ७ आग्स्ट रोज सोमवारला आयोजित करण्यात आले आहे. या अधीवेशनासाठी चिमूर वरून ओबीसी प्रतिनिधी रवाना झाले आहेत, ओबीसी महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता आंद्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी. यांचे हस्ते होईल. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवरग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी. मागासवर्गीय कल्याण मंत्री चेलू बोईना वेणू गोपाल कृष्णा. सहित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले. माजी मंत्री महादेव जानकर. आमदार ऍड अभिजित वंजारी. आमदार सुधाकर अडबले. माजी आमदार अविनाश वारजूकर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनामागील भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे मांडनार असून राष्ट्रीय मागासवरगचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही ईश्वरीय बीज मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेनासाठी चिमूर वरून प्रतिनिधी रवाना झाले असून या अधिवशनासाठी जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी महा अधिवेशनाकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.सतीश वारजुकर. विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते. चिमूर तालुका अध्यक्ष मारोतराव अतकरे. रामदास कामडी. कवडू लोहकरे. भावना बावनकर. ममता डूकरे. सविता चौधरी. रामभाऊ खडसिंगे. प्रभाकर पिसे. राजकुमार माथूरकर. प्रभाकर लॉथे यांनी केले.
ज्वाला समाचार सच का सामना