Breaking News

किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी विषयक जनजागृती कार्यक्रम साजरा

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

यवतमाळ:-दिनांक-25/7/2023 ला इसाफ फाऊंडेशन लिव्हेबल सिटी प्रोजेक्ट नागपूर तर्फे नागभीड मधील जनता कन्या आणि कनिष्ठ महाविद्यालय, येथे शिक्षण घेत असलेल्या सर्व किशोरवयीन मुलींसाठी एक विशेष उपक्रम राबविण्यात आला.. महिला व मुलींना होणाऱ्या मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या उद्देशाने, एक सुंदरसा आरोग्यदायी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

ह्या कार्यक्रमात शाळेचे पर्यवेक्षक बाबा चुटे सर, सौ.आरती गेडाम (पोलीस हवालदार), डॉ.पूजा साबळे , सौ.सिमा मेश्राम (समुपदेशक- आर.एच.नागभीड), सौ.सुनीता (समाजसेविका नागपूर), कुमारी.पूनम कुथे (समाजसेविका ब्रम्हपुरी), .अमित दास सर, राजेंद्र नारनवरे सर, सुमित यादव सर, संदिप जोशी सर, उदय सर (समाजसेवक), सौ. पूजा नागोसे,सागर जोशी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य महिला मार्गदर्शकांनी शाळेतील सर्व मुलींना “मासिक पाळी स्वच्छता” या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले व विशेष जागरुक कसे राहता येईल, हे सांगितले, ह्या कार्यक्रमात जवळपास त्या शाळेतील 250 मुलींनी सहभाग नोंदवीला होता. ह्या उल्लेखनीय कार्यक्रमाचे आयोजन अमित दास सर यांनी केले, तसेच राजेंद्र नारनवरे सर यांनी आभार व्यक्त केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved