Breaking News

जिल्हा परिषद शाळेला पडल्या जागो जागी भेगा

गावातील लहान मूले शिक्षणापासून वंचित नविन वर्गखोलीचे बांधकाम मंजूर करा – दिपक झोडे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील अडेगाव को. येथील जि. प. प्राथमिक शाळा तालूक्याच्या शेवटच्या टोकाला असल्याने जातीदुर्गम अवघड क्षेत्रात येत असून या शाळे मध्ये , १ ते ४ वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या ४४ आहेत.सदरच्या शाळेला दोन वर्गखोल्या असून १ वर्गखोलीला जागोमागी भेगा पडल्या असून, स्लॅब गळतीमुळे मागील सन २०२२ – २३ पासून शाळेशेजारील गावातील “बुद्धविहार” दोन वर्ग वर्षभर बसविले आहे.परंतु सध्याच्या परिस्थितीत “बुद्धविहार” पण गळत आहे.

त्यामुळे वर्ग १ ते ४ एकाच वर्गखोली मध्ये बसवीत असल्यामुळे वर्ग अध्यापण सुरळीत होतू शकत नाही.तसेच या शाळेची गुणवत्ता चांगली असल्यामुळे आजू – बाजूच्या गावातील मुले – मुली शिक्षणासाठी दाखल होत आहेत. या आधी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती चिमूर मध्ये दिनांक २४/९/२०२२ ला, जुनी इमारत (वर्गखोली) निर्लेखन प्रस्ताव सादर केलेला होता. परंतू सन – २०२२-२३ या वर्षातील वर्गखोली बांधकाम यादी मध्ये सदर शाळेचे नाव सूटलेले आहे. करीता आपण आपले स्तरावर पाठपुरावा करून नविन वर्गखोलीचे बांधकाम मंजूर करण्यात यांवी अशी मागणी दिपक झोडे जि.प.शाळा अध्यक्षानी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved