Breaking News

शैक्षणिक सत्र २०२३-२४ पहिली शिक्षण परिषद

जि.प.उच्च प्रा.केंद्र शाळा खैरी

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या खैरी केंद्र शाळेत शैक्षणिक सत्र २०२३ – २४ मधील केंद्रातील पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी पंचायत समिती राळेगाव येथे दिनांक २६- ७ -२३ रोज बुधवारला वेळ १२ ते ४ या वेळेत पार पडली . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायतचे उपसरपंच डॉ. श्रीकांत राऊत, तसेच ग्रामपंचायत सदस्य रवींद्र निवल सौ लता पवार तसेच ग्रामसेवक गजानन भोयर व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खैरी केंद्राचे केंद्र प्रमुख तसेच खैरी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश कुंभलकर सर यांनी केले. तसेच शैक्षणिक सत्र २०२२ – २३ चा मागोवा साधन व्यक्ती श्री प्रशांत महल्ले यांनी सादर केला. तसेच गणित विषय तज्ञ श्री मंगेश कोवळे सर व भाषा तज्ञ श्री संदिप आडे सर तसेच भाषा विषयाचे सादरीकरण कु. दिपमाला वेट्टी मॅडम यांनी आप आपल्या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सरोज शेंडे मॅडम व आभार प्रदर्शन श्री राजकुमार शिंदे यांनी केले. या शिक्षण परिषदेला सर्व खैरी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

खैरी केंद्रात आयोजित पहिली शिक्षण परिषद २०२३-२४ या कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी खैरी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रवीण दीडपाये,राजेंद्र दुरबुडे, महेंद्र कौराती, इरखडे सर,काकड सर,आडे मॅडम, स्वयंसेवीका योगिता धोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved