“तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांचे नागरिकांना आवाहन”
“मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे”
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाचे दिनांक 29 मे 2023 पत्रानुसार जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने १३ जुलै रोजी चिमूर उपविभागील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेव्दारे दिनांक 21 जुलै 2023 ते 21 ऑगष्ट 2023 दरम्यान मतदार यादी तपासणी करुन घरोघरी भेट देवून नविन मतदार, मृत्यु झालेले मतदार, मतदार यादीतील नोंद दुरुस्ती तसेच मतदार यादीतील व मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे जसे अस्पष्ट छायाचित्र दुरुस्ती करणेकरीता त्रुटी तपासून नमुना 6, 7 व 8 भरुन घेतील.
दिनांक 22 ऑगष्ट 2023 ते 29 सप्टेंबर 2023 पर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणार आहेत. तसेच दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदान केंद्रावर दावे व हरकती स्विकारणार आहेत.
याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चिमूर तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, चिमूर यांनी सर्व मतदारांना आव्हान करून केंद्रस्तरीय अधिकारी यांना नविन मतदार नाव नोंदणी करणे, मय्यत मतदाराचे नाव कमी करणेकरीता, सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सदर मोहिमेत नागरीकांनी सक्रिय प्रतिसाद द्यावा असे आवाहन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना