अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-खडसंगी बरडघाट व पांढरपौनी हे दोन्ही गाव बफर जंगलाला लागुन आहे. व शेती सुध्या बफर जंगलाला लागून आहे. तरी बरडघाट व पांढरपौनी हे दोन्ही गाव बफर मध्ये समाविष्ठ करुन घेण्यात यावे. व बरडघाट व पांढरपौनी गाव वन (प्रादेशिक) मध्ये येतो व जंगल हे बफर क्षेत्रामध्ये येतो आहे. तरी वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांना खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता शेती कामाचा मोसम (सिजन) आला आहे. मटका या वाघाचा सर्व शेतशिवारा मध्ये वावर करीत आहे. तरी त्या मटका वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा.
जर बरडघाट शेतशिवारामध्ये कोणतीही अनुचित घटना झाल्यास वनपरिक्षेत्र (बफर), खडसंगी व वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) चिमुर यांच्या मध्ये सिमा भागावरून वाद निर्माण होतो. बफरचे अधिकारी म्हणतात की आमच्या क्षेत्रामध्ये येत नाही तर प्रादेशिकचे वनअधिकारी म्हणतात की आमच्या क्षेत्रामध्ये येत नाही. तसेच गावातील पाळीव प्राण्यांना बफर जंगलात चराई करण्याकरीता जातात. परंतु वनपरिक्षेत्र (बफर) मधुन चराई पास मिळत नाही. तरी बरडघाट व पांढरपौनी गावातील पाळीव प्राणी चराई करण्याकरीता चराई पास मिळवून दयावी. व वन्य प्राण्यांच्या हल्यात पाळीव प्राणी किंवा मनुष्य जखमी किंवा मृत्यु पावल्यास तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. बरडघाट व पांढरपौनी हे गाव बफर क्षेत्राला लागून असल्यामुळे सदर दोन्ही गाव बफर क्षेत्रात समाविष्ठ करण्यात यावे.
तसेच सदर गावातील शेतकऱ्यांची शेती बफर क्षेत्राला लागुन असल्यामुळे वन्य प्राणी शेतकरयांचे उभ्या पिकाची खुप मोठया प्रमाणात नुकसान करीत आहेत. तरी वनपरिक्षेत्र (बफर) व वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) यांनी वन्य प्राण्यांचे तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा शेतकर्यांच्या शेती सभोवताल जाडीचे कुंपन करून वन्य प्राण्यांचे ‘बंदोबस्त करून देण्यात यावी. आम्हा शेतकऱ्याला प्रती एकर 50,000/- रुपये प्रती वर्षी ठेका पध्दतीने देण्यात यावी अन्यथा वन्यप्राण्यांचे बंदोबस्त कराये. वन्य प्राण्यापासून गावकर्यांना तसेच पाळीव प्राण्यांची जिवीत हानी झाल्यास किवा शेतकयांचे शेतीचे नुकसान झाल्यास याला सर्वस्वी वनविभाग जबाबदार असेल. म्हणून त्वरीत बफर व प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वन्यप्राण्यांचे बंदोबस्त करावे अन्यथा, बफर व प्रादेशिक कार्यालयावर गावकयांच्या मार्फत धडक मोर्चा काढण्यात येईल याला सर्वस्वी जबाबदार वनविभाग असेल. करीता आमदार बंटी भांगडिया यांनी आम्हा बरडघाट व पांढरपौनी गावकयांच्या वरील समस्यावर सहकार्य करावे. अशी मागणी गावकऱ्यांमार्फत वनविभाग प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
***
निवेदन देतांना माजी उपसरपंच तथा भाजपा बूथ अध्यक्ष प्रमोद श्रीरामे. भाजपा तालुका महामंत्री रोशन बनसोड, ग्रामपंचायत सदस्य सुरेश सहारे, नामदेव दोडके, स्वप्निल श्रीरामे, दुर्योधन दोडके, यासह 40 महिला पुरुषांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले.
शेतात येऊन या महागाईच्या काळात शेतमालाची नासधूस करणाऱ्या जंगली वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त वनविभागांनी करावा. नाहीतर शेतातील नासधूस करणाऱ्या वन्यप्राण्यांना शेतकऱ्यांना वन्यप्राणी मारण्याची परवानगी दयावी.–प्रमोद श्रीरामे, माजी उपसरपंच
ज्वाला समाचार सच का सामना