जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-शिवसेना ( उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात,चिमूर वरोरा हायवे रोडचे व पुलाचे बांधकाम करण्याबाबत एस आर के कंपनी च्या प्रोजेक्ट मॅनेजरला निवेदन देण्यात आले. कारण आजपर्यंत चिमूर वरोरा रोड ला आठ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा रोडचे काम झाले नाही . शेगाव बुजरुग येथे हायवे लगत पावसामुळे चिखलाचे साम्राज्य असल्याने भरपुर दुचाकी चारचाकी चा अपघात झाला असुन जीवितहानी सुद्धा झाली आहे तसेच स्मशानभूमी कडे जाण्याच्या मार्गाला पुलांचे बांधकाम पूर्ण न झाल्याने अपघात झाले.
तरी येत्या पंधरा दिवसात रोड व पुलाचे बांधकाम न झाल्यास एस आर. के.कंपनीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी दिला. त्यावेळी निवेदन देताना शिवसेना उपतालुका प्रमुख राजु राऊत, युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे, युवासेना विभाग प्रमुख रवी वाटकर, शिवसेना उपसरपंच साधनाताई मानकर, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल वाढई, उपतालुका प्रमुख लक्ष्मण ठेंगणे, उपतालुका प्रमुख सागर पिपंळशेंडे, विभाग प्रमुख दिलीप बोधाने,अनिकेत हिवरे, अभिषेक रायपूरकर, चिरंजीवी रावी, राकेश इखार, शिशुपाल हिवरकर, कपिल धकाते,समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना