Breaking News

खाजगी कामगाराला न्याय मिळावा याकरिता शिवसेना पक्षाचे महावितरणला निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-वरोरा शहरात विद्युत चे काम सुरु असताना महावितरण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे काम हलके करण्यासाठी खाजगी कामगार राहुल श्यामराव पोटदुघे वरोरा यांना विद्युत खांबावर चढवून काम करण्यास सांगितले नेहमी प्रमाणे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा या आशेने खांबावर चढला काम करत असताना खाजगी कामगार राहुल पोटदुघे काम करत असताना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे,खांबावरून खाली पडला. त्यामुळे राहुल पोटदुघे गंभीर जखमी झाला पण महावितरणने अपघात ग्रस्त खाजगी कामगारल राहुल पोटदुघेला संपूर्ण वैद्यकीय खर्च सुद्धा नाही दिला.

त्यामुळे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहर प्रमुख संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात अपघात ग्रस्त खाजगी कामगार राहुल पोटदुघे या खाजगी कामगाराला संपूर्ण वैद्यकीय खर्च देऊन व कायमस्वरूपी कामावर घ्यावे.
तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी संदीप मेश्राम यांनी कार्यकारी अभियंता साहेब महावितरण विद्युत कंपनी वरोरा यांना निवेदनाद्वारे केली.
त्यावेळी निवेदन देताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शिवसेना विधानसभा मिडिया प्रमुख गणेश चिडे, शिवसैनिक अनिल गाडगे, शिवसैनिक अतुल नांदे, समस्त पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved