Breaking News

शेवगांवमध्ये बलदवा दरोडा आणि दोघांची निर्घृण हत्या

हत्येचा जाहीर निषेध व तपास जलदगतीने करावा याकरिता निवेदन

शेवगांव तहसील कार्यालयावर मूक मोर्चा, अखिल भारतीय माहेश्वरी समाज यांच्यासह व्यापारी ग्रामस्थांचा सहभाग

विशेष पत्रकार – अविनाश देशमुख शेवगांव 
9960051755

शेवगांव:-यां बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील भर वस्तीत असलेल्या मारवाडी गल्लीत राहणाऱ्या आडत व्यापारी, तथा जिल्हा माहेश्वरी सभेच्या युवा शाखेचे अध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या राहत्या घरी झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेत त्यांच्या आई पुष्पाताई श्रीकिसन बलदवा व चुलते गोपीकिसन उर्फ दगडूशेठ गंगाबिसन बलदवा अशा दोघांची दरोडेखोरांनी धारदार शस्राने वार करून हत्या केली .तसेच त्यांची चुलती सुनिता यांना वीट फेकून मारून जखमी केले त्यामुळे शहर व तालुक्यात भितीचे व दहशतीचे वातावरण तयार झाले आहे .

या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा व तालुका माहेश्वरी सभा व समस्त ग्रामस्थांच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला .शहरातील बालाजी मंदिरापासून निघालेला हा मुक मोर्चा मुख्य बाजार पेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रांती चौक डॉ. आंबेडकर चौक संत गाडगे बाबा चौक मार्गे तहसील कार्यालयात आल्या नंतर तेथे पार पडलेल्या निषेध सभेत आमदार मोनिका ताई राजळे, माजी आमदार सुरेश जेठलीया, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस प्रताप ढाकणे, प . समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे, सजय कोळगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माहेश्वरी सभेचे प्रदेश अध्यक्ष मधुसुदन गांधी, सचिव सत्यनारायण सारडा , महेश सोमाणी, नाशिकचे उमेश मुंदडा, माहेश्वरी सभेच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण डागा, तिर्थपुरीच्या राधिका झंवर, आंदिनी या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करून पोलिस प्रशासनाने या घटनेचा तातडीने शोध लावावा .

तसेच जलद गती न्यायालयाच्या माध्यमातून आरोपी ना कडक शिक्षा व्हावी . जेणे करून पुढील काळात अशा प्रकारचे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही तसेच या घटनेची उच्च स्तरीय तपास यंत्रणेमार्फत तपास करण्याची मागणी केली .माहेश्वरी समाज शांतता प्रिय असून ठराविक चाकोरी बाहेर कधीही जात नाही . मात्र अनेकदा समाज कंटका कडून समाजातील निरपराध लोकांना लक्ष करण्यात येते . शेवगावातील बलदवा कुटूंबावर झालेला हा आघात राज्यातील तमाम समाज बांधवावकुटूंबावर झालेला हा आघात राज्यातील तमाम समाज बांधवावर झालेला असल्याने केवळ माहेश्वरी समाजच नव्हे तर शेवगाव शहर व तालुक्यातील जनतेला दहशतीतून बाहेर काढण्यासाठी आपले कसब दाखविण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली .

तालुका व जिल्हा माहेश्वरी सभेचे पदाधिकारी, सदस्य, तसेच महिला भगिनी त्याच बरोबर जिल्ह्यातील पाथर्डी, नेवासा, संगमनेर, आकोले तसेच पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पुणे, नाशिक आदि ठिकाणाहून माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष मनेष बाहेती, यां नी सुत्रसंचलन केले . तर तालुकाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बिहाणी यांनी आभार मानले . संघटनेच्या वतीने दिलेले निवेदन प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार रविंद्र सानप यांनी स्विकारले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, परिविक्षाधीन आय.पी.एस. अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी उपस्थित होते.

“ताजा कलम”

“विश्वसनीय सूत्रानुसार गुन्हे अंनवेशन विभाग अहमदनगर यांनी पाथर्डी येथुन एका संशयिताला संबंधित गुन्ह्यात चौकशी साठी अहमदनगर येथे नेले असल्याच्या जोरदार चर्चा शहरासह तालुक्यात सुरु आहेत”

अविनाश देशमुख शेवगांव
‘सामाजिक कार्यकर्ता/पत्रकार’

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved